मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कुणी आठवण काढल्यानं नाही तर ‘या’ कारणामुळे लागते उचकी; जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

कुणी आठवण काढल्यानं नाही तर ‘या’ कारणामुळे लागते उचकी; जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

जेवण सुरू असताना अचानक उचकी (Hiccups) लागते तेव्हा व्यक्ती अस्वस्थ होते. अनेकदा पाणी पिऊन (Drinking Water) किंवा वर आकाशाकडे पाहिलं की उचकी थांबते असं घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

जेवण सुरू असताना अचानक उचकी (Hiccups) लागते तेव्हा व्यक्ती अस्वस्थ होते. अनेकदा पाणी पिऊन (Drinking Water) किंवा वर आकाशाकडे पाहिलं की उचकी थांबते असं घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

जेवण सुरू असताना अचानक उचकी (Hiccups) लागते तेव्हा व्यक्ती अस्वस्थ होते. अनेकदा पाणी पिऊन (Drinking Water) किंवा वर आकाशाकडे पाहिलं की उचकी थांबते असं घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: जेवण सुरू असताना अचानक उचकी (Hiccups) लागते तेव्हा व्यक्ती अस्वस्थ होते. अनेकदा पाणी पिऊन (Drinking Water) किंवा वर आकाशाकडे पाहिलं की उचकी थांबते असं घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. पण ते करूनही आराम मिळत नसल्यास मोठी पंचाईत होते. उचकी लागणं ही गंभीर समस्या नाही; पण अनेकांना वारंवार उचक्या लागतात. उचकी थांबवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर नीतिका कोहली यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) काही घरगुती उपचार सांगितले आहेत. त्याचं अनुकरण केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’नं वृत्त दिलंय. घाईत जेवण करताना किंवा अचानक उचकी लागणं आरोग्यासाठी गंभीर समस्या नाही. पण आपण सार्वजनिक ठिकाणी बसलो आहोत आणि उचकी लागली की, सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळतात. अशावेळी तुम्हाला खजील (Awkward) व्हायला होतं. उचकी का लागते याचं मुख्य कारण वैद्यकीय शास्त्रात दिलं गेलंय. त्यानुसार, डायाफ्रॅम (Diaphragm) आणि बरगड्यांमध्ये (Ribs) असलेल्या इंटरकोस्टल पेशी ( Intercostal Cells) आकुंचन पावतात तेव्हा उचकी लागून आवाज येऊ लागतो. हेही वाचा -  किरकोळ आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेणं टाळा! संशोधनात समोर आल्या गंभीर बाबी उचकी थांबवण्यासाठी महत्त्वाचे उपाय उचकी थांबवण्यात साखर महत्त्वाची भूमिका बजावते. उचकी थांबत नसल्यास एक चमचा साखर खायला हवी. सारखेच्या गोडव्यामुळे काही वेळातच उचकी थांबू शकते व आपणाला दिलासा मिळू शकतो. याशिवाय उचकीवर दह्याचा एक उत्तम पर्याय आहे. उचकी लागताच एक चमचा दह्याचं सेवन करायचं. दह्याला कॅल्शियमचा उत्तम स्रोतही मानलं जातं. त्यामुळे याचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा. आलं अतिशय गुणकारी आयुर्वेदानुसार, उचकी लागल्यानंतर आलं (Ginger) अतिशय गुणकारी ठरू शकतं. ज्यावेळी अशी समस्या उद्भवेल तेव्हा आल्याचा एक तुकडा घ्यायचा आणि तो हळूहळू चावायचा. यामुळे नक्कीच उचकी थांबू शकते. केवळ उचकीच नाही तर अनेक समस्यांवर आलं गुणकारी ठरू शकतं. पाण्याने गुळण्या करा बऱ्याचदा उचकी लागल्यानंतर ती वेळेत थांबत नाही. त्यामुळे उचकी लागताच पाणी पित राहणं हा एक उत्तम पर्याय आहे. एक ग्लास पाणी प्यायल्यानंतरही उचकी थांबू शकते. इतकं करूनही उचकी न थांबल्यास गुळण्या केल्यास नक्कीच आराम मिळू शकतो. काळी मिरी प्रभावी तुम्ही काही न खाता-पिताही उचकी थांबवू शकता. यासाठी एक चमचा काळी मिरीची पावडर घ्यावी आणि ती हुंगावी. शिंक येईपर्यंत ही क्रिया करत राहायची आहे. शिंक आली की आपोआप उचकी थांबू शकते. याशिवाय तुम्ही गरम पाण्यात वेलदोडा पूड टाकून ते प्यायल्यास उचकीपासून आराम मिळू शकतो. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा वेलदोडा पूड टाकून त्याला 15 मिनिटांपर्यंत उकळून घ्यावे व नंतर चाळून ते प्यावं. यातूनही आराम मिळू शकतो. दरम्यान, घरात जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक उचकी लागते तेव्हा कुणीतरी तुमची आठवण काढत असेल असं ओघानं म्हटलं जातं. परंतु, या विधानाला काही शास्त्रीय आधार नाही. पणवरील घरगुती उपाय केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
First published:

Tags: Health, Home remedies, Lifestyle, Water

पुढील बातम्या