Home /News /lifestyle /

आता हे काय? कोरोना रुग्णामध्ये दिसली विचित्र लक्षणं; जगातील पहिलंच प्रकरण भारतात

आता हे काय? कोरोना रुग्णामध्ये दिसली विचित्र लक्षणं; जगातील पहिलंच प्रकरण भारतात

कोरोना रुग्णांमध्ये असं लक्षण दिसण्याचं जगातील पहिलं प्रकरण असल्याचा दावा भारतीय डॉक्टरानं केला आहे.

    जयपूर, 15 जानेवारी : खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास, थकवा, स्नायूंमध्ये वेदना,चव आणि श्वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम अशी लक्षणं सर्वसामान्यपणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतात. पण भारतात असे दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत ज्यांच्यामध्ये वेगळीच लक्षणं दिसून आली आहेत आणि जगातील हे पहिलं प्रकरण असल्याचा दावा भारतीय डॉक्टरानं केला आहे. राजस्थानमध्ये दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ज्यांच्यामध्ये ही विचित्र लक्षणं दिसू लागली आहे. एका रुग्णाच्या शरीरावर हर्पिज जोस्टर (herpes zoster) आहे, तर दुसऱ्या रुग्णाचे लिम्फ नोड्स (Lymph Nodes)  वाढले आहेत. सवाई मान सिंह रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान हर्पिज जोस्टरशी संबंधित कोरोनाचं हे जगातील पहिलं प्रकरण असल्याचा दावा या रुग्णालयाच्या डॉक्टरनं केला आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या ड्री सिंड्रोम म्हटलं आहे. हर्पिज जोस्टर असलेल्या 52 वर्षीय  कोरोना रुग्णाच्या बेंबी आणि डोळ्यांजवळ लालसर पुरळ उठले आहेत. हर्पिज जोस्टर शरीराच्या एकाच भागावर असतं पण या प्रकरणात दोन ठिकाणी दिसून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे वाचा - ब्रिटिश नको पुणेरी हवी; भारतातील कोरोना लशीला जगात मागणी हर्पिज जोस्ट वेरिसेला व्हायरसमुळे होतो. थंडी आणि पावसाळ्यात हा आजार होते. या व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णाच्या शरीरावर छोटे-छोटे पाण्यासारखे पुरळ येतात आणि त्यांचा आकार वाढू लागतो. हे पुरळ फुटल्यास संक्रमण अधिक धोकादायक होतो. ज्यांच्या शरीरात आधीपासूनच वेरिसेला जोस्टर व्हायरस असतो त्या लोकांना जास्त वेगानं याचा संसर्ग होतो. हे वाचा - मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था तर लिम्ड नोड वाढलेल्या रुग्ण इओसिनोफिल आजाराचा सामना करत होता. या 35 वर्षीय रुग्णाचे लिम्फ नोड्स तर वाढलेच होत शिवाय ल्युकोसाइट्ची पातळीही वाढली होती. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार याआधी इओसिनोफिल आणि कोरोना कधीच कुणाला एकत्र झालेला नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या