Home /News /lifestyle /

Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती

Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती

या करारानंतर आणि लुधियाना-आधारित केंद्राच्या विस्तारानंतर, Hero 2022 पर्यंत दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीची मागणी पूर्ण करू शकेल, असं निवेदनात म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : ऑटोमोबाईल प्रमुख हीरो इलेक्ट्रिक आणि महिंद्रा समूहानं बुधवारी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील धोरणात्मक कराराची घोषणा केली. या भागीदारीअंतर्गत, महिंद्रा समूह हिरो इलेक्ट्रिकच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी 'ऑप्टिमा' आणि 'NYX' ची बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेशातील पीथमपूर येथील प्लांटमध्ये त्या तयार करेल, असे दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. या करारानंतर आणि लुधियाना-आधारित केंद्राच्या विस्तारानंतर, Hero 2022 पर्यंत दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीची मागणी पूर्ण करू शकेल, असं निवेदनात म्हटलं आहे. हिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल म्हणाले, 'या भागीदारीत, दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील एकमेकांच्या सखोल ज्ञानाचा फायदा घेत पुढील काही वर्षांमध्ये नवीन उत्पादनं तयार करतील." महिंद्रा अँड महिंद्राचे (ऑटो अँड फार्म्स) कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, या धोरणात्मक भागीदारीमुळं दोन्ही व्यवसायांच्या एकत्रित ताकदीचा फायदा होईल. हे वाचा - टाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG झाल्या लॉन्च, वाचा सर्व फिचर बदलते EV मार्केट काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी (Electric vehicles) एक मोठी बातमी होती. ई-वाहन मालक आता त्यांच्या कारचं (वाहन) चार्जिंग घर किंवा कार्यालयातच करू शकतील. सरकारनं ई-वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वं आणि मानकं जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ई-वाहन मालक आता घर किंवा कार्यालयात असलेल्या वीज कनेक्शनवरून त्यांची कार चार्ज करू शकतील. यासाठी वेगळं कनेक्शन घेण्याची गरज नाही. हे वाचा - Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM, इतकी आहे किंमत! सरकारही बदल करत आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं (Union Ministry of Power) 14 जानेवारी 2022 रोजी ई-वाहनांच्या चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. हे नवे दिशानिर्देश 1 ऑक्टोबर 2019 रोजी मंत्रालयानं जारी केलेल्या सुधारित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वं आणि मानकांची जागा घेतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वाहन मालक आता त्यांच्याकडं असलेलं वीज कनेक्शन वापरून त्यांची ई-वाहनं त्यांच्या घरी किंवा कार्यालयात चार्ज करू शकतील. लांब पल्ल्याच्या ई-वाहनं किंवा अवजड ई-वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधांशी संबंधित आवश्यकतांचा देखील यात उल्लेख आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike riding, Electric vehicles

    पुढील बातम्या