मुंबई, 30 जानेवारी : चांगल्या आरोग्यासाठी (good health) चांगली झोप (sound sleep) अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनियमित दिनचर्या, आहार आणि कमीतकमी शारीरिक कष्टामुळे लोकांना झोप येत नाही. मग हळूहळू ही समस्या अनिद्रेच्या आजारात रूपांतरित होते. याकडं लक्ष दिलं नाही तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.
आपण आपल्या जीवनशैलीत (lifestyle) बदल केले नाही तर मात्र या समस्येपासून सुटका होणं शक्य नाही. अपुऱ्या झोपेमुळं हृदयविकार, किडनीचे आजार, उच्च रक्तदाब (high blood pressure), मधुमेह, जाडी वाढणं अशा अनेक गुंतागुंती शरीरात निर्माण होऊ शकतात. मात्र तुम्हाला चांगली झोप मिळाली तर या सगळ्यापासून दार राहता येतं. आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांच्या मते, काही साध्यासरळ आयुर्वेदिक टिप्सचा (tips) अवलंब केला तर तुमची झोप न लागण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.
रात्री चांगल्या झोपेसाठी ग्लासभर म्हशीचं दूध (buffalo milk) पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. यासोबतच झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ केल्यानंही शरीर हलकं होईल आणि चांगली झोपे लागेल. याशिवाय झोपण्याआधी पायाच्या तळव्यांना मोहरीचं तेल लावून नाजूकपणे, हळूवारपणे मालिश करणंही फायद्याचं आहे.
हे वाचा - खवखवणाऱ्या घशाकडे दुर्लक्ष नको; असू शकतं मानसिक आजाराचं लक्षण
हे उपाय अमलात आणतानाच काही पथ्यही पाळणं आवश्यक आहे. रात्र पोट भरून जेवणं तसंच तेलकट, मसालेदार जेवण टाळलं पाहिजे. तसंच रात्रीचं जेवण हे संध्याकाळी सातच्या आधीच होईल, याचीही काळजी घेतली पाहिजे. रात्री झोपताना काहीवेळ ध्यानही तसंच योगाही करा.
तुम्ही हे उपाय (remedies) अमलात आणले तर केवळ झोपेचीच समस्या सुटेल असं नाही तर शारीरिक आणि मानसिक आजारपणातूनही तुमची सुटका होईल. सोबत दिनचर्या नियमित आणि साधी सरळ राखण्याने मूड नेहमीच फ्रेश (fresh) राहतो. मूड फ्रेश राहिल्यानं समोरच्यावर चांगला प्रभाव पडतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.