नवी दिल्ली, 04 एप्रिल : शर्टच्या बटणांमधून बाहेर डोकावणारं आपलं पोट केवळ व्यक्तिमत्व खराब करत नाहीत तर ते आपल्या आरोग्यासाठीही खूप हानिकारक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटावर साठलेल्या चरबीमुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाइप-2 मधुमेह, दमा आणि स्तनाचा कर्करोग होतो. अशा स्थितीत जास्त वजन आणि पोटावरील चरबीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आज तकने दिलेल्या बातमीनुसार, आपण जिम आणि फॅट बर्नरशिवाय पोटाची चरबी कशी कमी करायची त्याविषयी (Belly Fat Tips) जाणून घेऊया.
1. साखर आणि कर्बोदके -
अन्नामध्ये साखर आणि कर्बोदकांचे जास्त प्रमाणात असणे, हे पोटावरील चरबीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे साखर आणि कर्बोदके असलेल्या गोष्टी आपल्या आहारापासून लांब ठेवणे चांगले. जास्त साखर आणि कार्ब्समुळे शरीरात इन्सुलिन तयार होते, जे पोट बाहेर येण्याचे एक मोठे कारण आहे.
2. आहार -
आहारातून कार्बोहायड्रेट काढून टाकण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व चांगली चरबी काढून टाकली पाहिजे. आहारात निरोगी कर्बोदकांसोबतच हिरव्या भाज्या आणि प्रथिनांचे प्रमाणही वाढवावे. यासाठी टोफू, चिकन, अंडी, सॅल्मन फिश आणि फायबर युक्त फळांचा आहारात समावेश करू शकता.
3. शारीरिक हालचाली-
घर किंवा ऑफिसमध्ये तुमची शारीरिक हालचाल शून्य होऊ देऊ नका. घरी दररोज थोडा वॉर्म अप करा. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जा. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये कामाच्या दरम्यान थोडा वेळ शरीर स्ट्रेच करत राहा. तुमच्या क्षमतेनुसार काही वजन उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे कॅलरीज वाढणार नाहीत आणि शरीर तंदुरुस्त राहिल. नियमित क्रंच, सायकल क्रंच, पोट व्हॅक्यूम आणि प्लँक यांसारख्या व्यायामामुळे देखील पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची गरज भासणार नाही.
4. जिभेवर नियंत्रण ठेवा-
तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड असेल तर जिभेवर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 'चीटिंग डे' ठरवा आणि आठवड्यातून एकदा तुम्ही चवीनुसार खाऊ शकता, परंतु उर्वरित 6 दिवस तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घ्यावी लागेल.
हे वाचा - येत्या 50 वर्षांत येऊ शकतात अनेक साथीचे आजार; संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा
5. भरपूर पाणी प्या-
शरीरात पाण्याची कमतरता अजिबात होऊ देऊ नका. शरीरातील पुरेशा प्रमाणात पाणी पेशी आणि स्नायूंना हायड्रेट ठेवते. जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला भूकही कमी लागते आणि शरीरातील कार्ब्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या.
हे वाचा - तापलेल्या तव्यावर पाणी यासाठी ओतायचं नसतं; वास्तुशास्त्रात सांगितलेत या गोष्टी
6. 8 तासांची झोप-
धावपळीच्या काळात पुरेशी झोप घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे मानसिक ताण तर कमी होतोच, पण शरीरातील पेशी आणि स्नायूचीं झीज भरून निघते. दररोज सुमारे 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने तुम्ही स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Weight, Weight loss tips