Home /News /lifestyle /

Reduce Fever Tips: 100 डिग्रीच्यावर गेलेला तापही खाली आणू शकतील हे 7 घरगुती उपाय

Reduce Fever Tips: 100 डिग्रीच्यावर गेलेला तापही खाली आणू शकतील हे 7 घरगुती उपाय

तापासोबत हुडहुडी, अंगदुखी, उलटी यासारखी लक्षणे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे योग्य आहे. तापावर प्राथमिक उपचार म्हणून आपण काही घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल.

    नवी दिल्ली, 21 जानेवारी : कोरोना संसर्ग झाल्यामुळे किंवा फ्लूमुळे ताप (fever) येण्याची समस्या सामान्य आहे. सौम्य तापावर औषधांशिवायही आराम मिळू शकतो. परंतु, तापासोबत हुडहुडी, अंगदुखी, उलटी यासारखी लक्षणे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे योग्य आहे. तापावर प्राथमिक उपचार म्हणून आपण काही घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल. याविषयी जाणून (Home remedies to reduce fever) घेऊया भरपूर पाणी प्या झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, ताप असताना शरीराचे वाढते तापमान कमी करण्यासाठी नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी (Drinking Water) पिणे आवश्यक असते. पाणी न पिल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. फळांचे रस, हर्बल टी आणि काढाही पिणं फायदेशीर ठरेल. विश्रांती (relaxation) संसर्गाशी लढण्यासाठी शरीराला भरपूर ऊर्जा लागते. ताप असलेल्या रुग्णांनी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी शक्य तितकी विश्रांती घ्यावी. आजारी असताना विश्रांती घेणे फार महत्त्वाचे असते, त्यामुळे लवकर बरे होण्यास मदत मिळते. कोमट पाण्याने अंघोळ शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्याने आंघोळ देखील करू शकता. थकलेल्या कमजोर स्नायूंना आंघोळ केल्याने आराम मिळेल. हलके कपडे घाला अनेकदा ताप आल्यावर लोक खूप जाड कपडे घालतात, असे केल्याने ताप आणखी वाढू शकतो. त्यामुळे हलके कपडे घाला. स्पंज करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आंघोळ करू शकत नसल्यास, तापमान कमी करण्यासाठी तुमच्या शरीराला थंड पाण्याने स्पंज लावा. कपाळ आणि मानेच्या भागाकडे अधिक लक्ष द्या. एका वेळी एक भाग स्पंज करा त्यावेळी उर्वरित शरीराचा भाग झाकून ठेवा. हे वाचा - महिलांसाठी महत्त्वाची आहेत ही vitamins आणि मिनरल्स; पाहा कोणत्या वयात कशाची असते गरज बर्फाचा उपयोग पाणी किंवा इतर द्रव गोष्टी पिण्याने मळमळ होत असेल तर त्याऐवजी तुम्ही बर्फ चोखू शकता. पातळ केलेला फळांचा रस एका आईस-क्यूब ट्रेमध्ये ठेवा आणि तो सतत चोखत राहा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. हे वाचा - Smartphone blast: सांगलीत तरुणाच्या खिशात OnePlus मोबाइलचा स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत गुळण्या करणे - घसादुखी आणि तापामध्ये कोमट पाण्याने गुळण्या केल्याने बरे वाटेल. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि दिवसातून चार वेळा गुळण्या करा. मध आणि सफरचंद सायडर व्हिनेगर देखील पाण्यात मिसळून आपण गुळण्या करू शकता. याचा चांगला परिणाम दिसून येतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या