मुंबई, 03 डिसेंबर : लग्नानंतर सासरी गेल्यानंतर मुलींनाच बऱ्याचशा गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. किंबहुना सर्व तडजोडी त्यांनी पूर्णपणे स्वीकाराव्यात, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या आजच्या काळातही कमी नाही. असे अनेक प्रसंग येतात, त्यावेळी जुळवून घेणं सोपं नसतं. त्यामुळं मग भांडणाची परिस्थिती निर्माण होते. लग्नानंतर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही मुद्द्यांवर आधीच बोलणं कधीही चांगलं (Happy Marriage Tips) असतं.
'टीव्ही 9'ने दिलेल्या बातमीनुसार लग्न ही कोणत्याही मुलीसाठी जीवनात मोठा बदल करणारी घटना असते. लग्नानंतर आपलं घर सोडून नवीन कुटुंब आणि नवीन संस्कृती अंगीकारणं हे मुलींसाठी मोठं आव्हान असतं. अशा स्थितीत मुलीला समजून घेणारा आणि मदतीचा हात देणारा जोडीदार मिळणं खूप महत्त्वाचं असतं. तिला प्रत्येक टप्प्यावर समजून घेऊ शकेल आणि तिला साथ देईल, अशा जोडीदाराच्या पाठिंब्यानं जीवनाची नवी घडी बसवणं (Good Marriage Life) सोपं जातं.
यासाठी लग्नापूर्वी मुलीने तिच्या भावी जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर मोकळेपणानं बोललं पाहिजे. कारण, लग्नानंतर असे अनेक प्रसंग येतात, जिथं जुळवून घेणं सोपं नसतं. तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. या बाबींवर तुम्ही एकमेकांशी आधीच क्लियर असाल तर भविष्यात तुमच्या नात्यात कटुता येणार नाही. आज इथं आपण अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेकदा वैवाहिक जीवनात भांडणाचं कारण बनतात. त्यांच्याबद्दल आधीच बोलणं शहाणपणाचं ठरेल.
आर्थिक स्थिती
लग्नापूर्वी मुलाशी त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणं विचित्र वाटतं. परंतु इथं आपण व्यावहारिकपणे विचार करणं आवश्यक आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलण्याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला पैशांचा लोभ आहे. तर, पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक स्थितीवर बोलल्यानंतर, लग्नानंतर तुमचा जोडीदार तुमच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे की नाही, हे तुम्हाला समजेल. नोकरी करत असाल तर दोघांना मिळून घरखर्च चालवावा लागेल. अशा परिस्थितीत तुमच्या वाट्याला किती आणि त्याच्या वाट्याला किती असेल हे तुम्हाला वेळीच कळेल. या गोष्टींबद्दल तुम्ही जितकं जास्त बोलाल आणि जास्त चर्चा कराल, तितक्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील.
हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक
राहण्याचं ठिकाण आणि जोडीदाराचा घरकामातील सहभाग
तुम्ही (महिला) काम करत असाल तर, हा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला राहण्यासाठी अशी एक जागा राहण्यासाठी लागेल जिथून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सहज पोहोचू शकता. नोकरी करणाऱ्या मुलीला लग्नानंतर कामाच्या ठिकाणचं काम आणि घरातील काम अशा दोन्ही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळं राहण्याचं ठिकाण आणि जोडीदाराचा घरकामातील सहभाग याविषयी आधीच बोलल्यास दोघांनाही आपापल्या जबाबदारीची जाणीव होईल. शिवाय, काही समस्या निर्माण होण्याआधीच त्यांचं निराकरण होईल.
हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा
कुटुंबीयांसोबत राहणार की स्वतंत्र राहणार याविषयी बोलावे
'तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहशील की, नवीन घर घेशील,' हे विचारायला त्रासदायक वाटतं. पण लग्नानंतर या मुद्दा निघाल्यानंतर अनेक घरांमध्ये तो भांडणाचे रूप घेतो. जर तुम्ही कुटुंबाशी जुळवून घेऊ शकत नसाल तर, त्याबद्दल आधीच बोलणं शहाणपणाचं आहे. याशिवाय लग्नानंतर सुरुवातीला दोघांनाही दिवसातील जास्तीत जास्त वेळ प्रायव्हसी मिळण्याची गरज असते. अशा स्थितीत तुम्हाला काय वाटतं, त्याबद्दल त्या मुलाला आधीच सांगा आणि त्याचं मतही जाणून घ्या. या विषयावर बोलल्यानं भविष्यात एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.