मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पिल्लांना वाचवण्यासाठी घारीशी भिडली कोंबडी, अक्षरश: पिसंच काढली; VIDEO VIRAL

पिल्लांना वाचवण्यासाठी घारीशी भिडली कोंबडी, अक्षरश: पिसंच काढली; VIDEO VIRAL

उंच उडणार घार (black kite) आणि जमिनीवर लुटूलुटू चालणारी कोंबडी (hen) यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण जेव्हा पिल्लांवर संकट येतं तेव्हा आई म्हणून कोंबडी घारीची काय अवस्था करू शकते, हे तुम्ही व्हिडीओतच पाहा.

उंच उडणार घार (black kite) आणि जमिनीवर लुटूलुटू चालणारी कोंबडी (hen) यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण जेव्हा पिल्लांवर संकट येतं तेव्हा आई म्हणून कोंबडी घारीची काय अवस्था करू शकते, हे तुम्ही व्हिडीओतच पाहा.

उंच उडणार घार (black kite) आणि जमिनीवर लुटूलुटू चालणारी कोंबडी (hen) यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण जेव्हा पिल्लांवर संकट येतं तेव्हा आई म्हणून कोंबडी घारीची काय अवस्था करू शकते, हे तुम्ही व्हिडीओतच पाहा.

मुंबई, 08 जानेवारी : माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी... जीव वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील आईची माया मात्र सारखीच असते. आपल्या लेकरांसाठी ती कितीही मोठ्या संकटाचा सामना करू शकतो. अगदी आपल्या जीवाचाही विचार न करता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी चक्का घारीशी भिडली आहे.

आकाशात उंच भरारी घेत आपला सावज शोधून त्याला कळण्याच्या आतच शिकार करणारी घार आणि फार उंच उडता न येणारी आणि जमिनीवर लुटूलुटू चालणारी कोंबडी. दोन्ही पक्षांमध्ये कमालीची तफावत. किंबहुना त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण जेव्हा पिल्लांवर संकट येतं तेव्हा आई असलेली हीच कोंबडी काय करू शकते याचं हे उत्तम उदाहरण.

व्हिडीओत पाहू शकता कोंबडीची पिल्लं तिथं दाणे टिपत आहे. आपल्या पिल्लांवर कुणाची नजर तर नाही ना यावर कोंबडी बारीक लक्ष ठेवून आहे. इतक्यात वरून एक घार त्या पिल्लांवर हल्लावर करायला येते. पण सावध असलेली कोंबडी त्या घारीला पिल्लांची शिकार करणं तर दूरच त्यांना स्पर्शही करू देत नाही. वेगानं जमिनीवरील पिल्लांवर तुटून पडण्याच्या विचारात असणाऱ्या या घारीला पिल्लू सापडण्याआधी कोंबडीच त्या घारीवर तुटून पडते.

हे वाचा - पिल्लाला वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; उंदरीणीच्या धाडसाचा थरारक VIDEO VIRAL

कोंबडी घारीला चांगलंच धरून ठेवते. फक्त धरून ठेवत नाही तर ती घारीला खेचत खेचत आपल्या पिल्लांपासून दूर घेऊन जाते. घार कोंबडीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते. पण तिचा प्रयत्न काही यशस्वी होत नाही. कोंबडी अक्षरशः तिची पिसंच काढते. पिल्लांपासून दूर एका कोपऱ्यात नेल्यानंतर ती घारीला सोडते.

तिथंही कोंबडी घारीकडे रागानं बघत ओरडते. जणू काही ती घारीला माझ्या पिल्लांकडे पाहशील तर गाठ माझ्याशी आहे, असंच दटावते आहे. घारही ओरडू लागते पण भीतीनं. कोंबडीचं हे असं रूप पाहून ती खूपच घाबरलेली दिसते आहे. गुपचूप ती त्या कोपऱ्यात बसून राहते आणि कोंबडी आपल्या पिल्लांकडे पुन्हा जाते.

हे वाचा - VIDEO : अपडाऊन नव्हे फ्रंट टू बॅक; तीक्ष्ण नजरेच्या गरुडाच्या पापण्यांची उघडझाप

IFS अधिकारी सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मदर्स पॉवर असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

First published:

Tags: Social media viral, Viral, Viral videos