एकाच जीनपासून झाली होती हिमोग्लोबिनची उत्पत्ती; संशोधकांनी केला महत्त्वपूर्ण खुलासा

साधारणपणे एखाद्या जीवाचा (Organism) शोध लागल्यानंतर वैज्ञानिक त्याचा मूळ उगम कुठे झाला आहे याचा शोध घेत असतात. यासाठी त्याचे पूर्वज (Ancestors) कोणकोणते होते याचा शोध घेऊन हा विषाणू किंवा जीव कुठे निर्माण झाला याचा शोध घेतला जातो.

साधारणपणे एखाद्या जीवाचा (Organism) शोध लागल्यानंतर वैज्ञानिक त्याचा मूळ उगम कुठे झाला आहे याचा शोध घेत असतात. यासाठी त्याचे पूर्वज (Ancestors) कोणकोणते होते याचा शोध घेऊन हा विषाणू किंवा जीव कुठे निर्माण झाला याचा शोध घेतला जातो.

  • Share this:
    साधारणपणे एखाद्या जीवाचा (Organism) शोध लागल्यानंतर वैज्ञानिक त्याचा मूळ उगम कुठे झाला आहे याचा शोध घेत असतात. यासाठी त्याचे पूर्वज (Ancestors) कोणकोणते होते याचा शोध घेऊन हा विषाणू किंवा जीव कुठे निर्माण झाला याचा शोध घेतला जातो. सध्या संशोधकांनी अशाच पद्धतीने हिमोग्लोबिनच्या(Haemoglobin) उत्पत्तीचा शोध लावला आहे.  पॅरिसच्या सीएनआरएस युनिव्हर्सिटी आणि सोर्बोन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी सेंट पीटरबर्ग युनिव्हर्सिटी आणि रिओ डी जनेरियो विद्यापीठाबरोबर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. यामध्ये हिमोग्लोबिन एकाच प्रजातीमधून(Common Ancestors) सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे सर्व प्राण्यांच्या आणि माणसाच्या आढळणारा हिमोग्लोबिन हा घटक एकाच असल्याचे समोर आलं आहे. या विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात हिमोग्लोबिन एकाच पेशीमधून सर्व प्रजातींमध्ये पसरला आहे. या संबंधीचे संशोधन BMC इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हिमोग्लोबिनचे कार्य हे सजीवांमध्ये रक्तात ऑक्सिजनचे भिसरण योग्य पद्धतीने करणे आहे. आपल्या रक्ताचा रंग देखील हिमोग्लोबीनमुळे लाल असतो. हिमोग्लोबिन केवळ सस्तन प्राण्यांमध्येच नाही तर किडे, विंचू आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमधे देखील आढळून येतो. विविध प्रजातींमध्ये आढळून येणाऱ्या हिमोग्लोबिनची (Haemoglobin) उत्पती अनेकवेळा झाल्याचा आजपर्यंत समाज होता. परंतु या नवीन संशोधनामुळे एकाच प्रजातीपासून हिमोग्लोबिन तयार झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं याचे पूर्वज देखील एकच असल्याचं देखील या संशोधनात सिद्ध झालं आहे. या संशोधनात संशोधकांनी मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन (Haemoglobin) असणाऱ्या जीवांवर लक्ष केंद्रित करून संशोधन केलं. यामध्ये त्यांना ग्लोबीन नावाचं प्रोटीन आढळून आलं. हे प्रोटीन सर्व जीवांमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रिक ऑक्साइड यांसारखे गॅस साठवत असतात. याचबरोबर या संशोधनात संशोधकांनी प्लेटीनेरेस डुमेरीली (Platy nereis demirelief) या समुद्रातील जिवाच्या रक्ताचे निरीक्षण केलं. यामध्ये त्यांना या प्राण्याच्या रक्ताची आणि इतर प्राण्यांच्या रक्ताची तुलना करून हिमोग्लोबिनचे उत्पत्तीचा शोध लावला आहे. प्लेटीनेरेस डुमेरीली हा जीव खूप हळूहळू विकसित झाल्यानं त्याच्या रक्तावर संशोधन करून हिमोग्लोबिनचे या उत्पत्तीचा शोध घेण्यात आला. या संशोधनानंतर आता संशोधक बाइलेटेरियन व्हॅस्कुलर सिस्टमच्या पेशींचा अभ्यास करून त्या कशा विकसित झाल्या यावर संशोधन करणार आहेत. दरम्यान, या संशोधनात संशोधकांना लाल रक्त असणाऱ्या जीवांमध्ये एकच जीन असल्याचे समोर आलं आहे. हा जीन साइटोग्लोबिन सारखा ग्लोबीन असून स्वतंत्ररित्या विकसित होऊन जीन एन्कोडिंग हिमोग्लोबिन(Haemoglobin) बनला. हा जीन आपल्या पूर्वजांमध्ये ऑक्सिजनच्या वाहतुकीस अधिक प्रभावी होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published: