Home /News /lifestyle /

हेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण हृदयाने सोडला नाही जीव; रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं

हेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण हृदयाने सोडला नाही जीव; रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं

फोटो सौजन्य - एपी

फोटो सौजन्य - एपी

इतक्या मोठ्या हेलिकॉप्टर (helicopter) दुर्घटनेत नाजूक हृदयाला (heart) धक्काही लागला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या शरीरात विसावण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती.

    वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर : धडधडतं हृदय (heart) घेऊन जाणाऱ्या एखाद्या अॅम्ब्युलन्स किंवा हेलिकॉप्टलरला (helicopter) अपघात झाला. अॅम्ब्युलन्स किंवा हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला मात्र त्याच्या आता असलेलं हृदय मात्र धडधडत राहिलं. इतक्या मोठ्या दुर्घटनेत या नाजूक हृदयाला धक्काही लागला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या शरीरात विसावण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती...एखाद्या फिल्मची ही कथा वाटावी, मात्र ही रिल नाही तर रिअल लाइफमधील स्टोरी आहे. अमेरिकेत (america) हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्समार्फत एक हृदय प्रत्यारोपणासाठी नेलं जात होतं. मात्र ते हृदय गरजूपर्यंत पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. पण त्यातलं हृदय धडधडत राहिलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी कॅलिफोर्नियातील (California) सॅन डिएगोहून (San Diego) लॉस एंजिलसपर्यंत (los angeles) हेलिकॉप्टरनं हृदयाचा प्रवास सुरू झाला. हेलिकॉप्टर ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं. USC Keck Hospital च्या टेरेसवरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होणार त्याआधीच त्यामध्ये बिघाड झाला ते अचानक गरगर फिरू लागलं आणि क्रॅश झालं. हेलिकॉप्टर हॉस्पिटलच्या टेरेसवर कोसळलं, हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला, त्याचे भाग सर्वत्र पसरले. सुदैवानं पायलटला किरकोळ दुखापत झाली आणि इतर दोन आरोग्यकर्मचाऱ्यांचा जीवही वाचला. हे वाचा - एक पाय नसूनही खेळतो फुटबॉल; VIDEO पाहून चिमुरड्याच्या जिद्दीला कराल सलाम! विशेष म्हणजे मानवी शरीराबाहेर असलेलं एका बॉक्समधील हृदयानंही जीव सोडला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती.  कसंबसं करून हे हृदय असलेला बॉक्स हेलिकॉप्टरमधून बाहेर काढला. एका आरोग्यकर्मचाऱ्याच्या हाती तो बॉक्स दिला आणि  तो कर्मचारी थेट ऑपरेशन थिएटरच्या दिशनं धावत सुटला. गरजू रुग्णापर्यंत हृदय अखेर पोहोचलं. त्याच्या शरीरात या हृदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. दुर्घटनेवेळी हृदयानं जीव सोडला नाही म्हणून आज ते या रुग्णाच्या शरीरात त्याच्या जीवासाठी धडधडत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: United States of America

    पुढील बातम्या