मूल बुटकंच राहिलं; वय वाढलं पण उंची नाही असं का?

मूल बुटकंच राहिलं; वय वाढलं पण उंची नाही असं का?

हल्ली कित्येक मुलं अशी आहेत ज्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांची उंची (height) वाढत नाही.

  • Last Updated: Dec 1, 2020 03:18 PM IST
  • Share this:

शरीराच्या वाढीस आणि विकासासाठी शरीरात हार्मोन्स म्हणजे संप्रेरक तयार होत असतात. मेंदूमध्ये असलेल्या पिट्युटरी ग्रंथीद्वारे तयार होणारे संप्रेरकांचा यात समावेश आहे. जेव्हा या संप्रेरकाची कमतरता उद्भवते तेव्हा मुलांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम होतो. वाढीचं संप्रेरक यांचा अभाव दोन प्रकारचा आहे. प्रथम जन्मजात असतात. ज्यामध्ये मुलास जन्माच्या वेळी या समस्येचा त्रास होतो. त्यांना इतर संप्रेरक संबंधित समस्या देखील असू शकते. जरी त्यांचा जन्म या अवस्थेत झाला असला तरी काही मुलांमध्ये साधारणतः ते 6 ते 12 महिन्यांचे होईपर्यंत वाढ होते असल्याचे दिसतं. जेव्हा शरीरात वाढ होण्यासाठी संप्रेरकांची सामान्य वाढ होण्यास प्रतिबंध होतो तेव्हा द्वितीय वाढीच्या संप्रेरकाची कमतरता उद्भवते. हे बालपणात कधीही सुरू होऊ शकते.

मुलांमध्ये दिसू लागतात ही लक्षणे

नियमित तपासणी दरम्यान डॉक्टर मुलांची उंची तपासतात. कालांतराने मुलं किती वेगानं वाढतात हे डॉक्टर पाहू शकतात. जर मूल त्याच्या वयापेक्षा कमी गतीनं वाढत असेल तर त्याला ग्रोथ फेल्योर म्हणतात. सर्वात लक्षणीय चिन्हांपैकी एक म्हणजे उंचीत वाढ जी इतर मुलांपेक्षा कमी दिसते.परंतु काही मुलांची उंची कमी नसली तरीही त्यांच्यात ग्रोथ फेल्योर असू शकते. इतर लक्षणांमध्ये इतर मुलांपेक्षा खूपच तरुण दिसणं म्हणजे उशिरा तारुण्य येणं. उशिरा दात, नखं वाढणं, स्नायू कमकुवत होणं, ऊर्जा कमी होणं, पुरुषांमध्ये लिंग लहान असणं, रक्तातील साखर कमी असणं ही लक्षणं समाविष्ट आहेत.मुलांमध्ये वाढीच्या संप्रेरकाची कमतरता पाहण्यासाठी काही चाचण्या केल्या जाऊ शकतात जसं रक्ताची चाचणी, हाडांचं वय तपासणारा एक्स-रे, जीएच सिम्युलेशन टेस्ट, मेंदूचा एमआरआय.

प्रौढांमध्येही उद्भवू शकते  ही समस्या

myupchar.comचे डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, की शारीरिक वाढीस प्रोत्साहित करणाऱ्या संप्रेरकांचा अभाव पिट्युटरी गाठ किंवा एखाद्या प्रौढ व्यक्तीला मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे होऊ शकतो. यात शरीराची रचना बदलणं, ऑस्टिओपोरोसिस, स्नायूंची शक्ती कमी होणं, ऊर्जेची पातळी कमी होणं, एलडीए कोलेस्ट्रॉलची वाढ किंवा हृदयाचा कार्य करण्याची अस्थिरता अशी काही लक्षणं असू शकतात.

दररोज इंजेक्शनची आवश्यकता

शारीरिक वाढीस प्रोत्साहित करणाऱ्या संप्रेरकांच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी वाढ संप्रेरक सुधारण्यासाठी दररोज इंजेक्शन देणं आवश्यक असतं. लहानपणापासून प्रौढपणापर्यंत या वाढीच्या संप्रेरकाच्या कमतरतेवर जर उपचार केले असतील तर हे संप्रेरक वयस्क होईपर्यंत सामान्य केले जाऊ शकतात. एखाद्या मुलापेक्षा प्रौढ व्यक्तीसाठी वाढीच्या संप्रेरकाची पातळी सामान्य किंवा कमी असू शकते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख –हार्मोनल असंतुलन: लक्षणे, कारणे ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 1, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या