मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दिसायचं असेल चिरतरुण तर, लवकर सोडा ‘या’ सवयी

दिसायचं असेल चिरतरुण तर, लवकर सोडा ‘या’ सवयी

त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणं आणि डोळ्यांखाली काळी वर्तूळं येणं किंवा सूज येणं हे सगळं जास्त मद्यपान करण्याच्या सवयीमुळे होऊ शकत आणि चेहरा खराब दिसायला लागतो.

त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणं आणि डोळ्यांखाली काळी वर्तूळं येणं किंवा सूज येणं हे सगळं जास्त मद्यपान करण्याच्या सवयीमुळे होऊ शकत आणि चेहरा खराब दिसायला लागतो.

त्वचेवर अकाली सुरकुत्या (Wrinkles) पडणं आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं किंवा सूज येणं हे सगळं चुकीच्या सवयीमुळे होऊ शकतं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 13 जुलै: वाढत्या वयाला थांबवता येत नाही. पण, म्हातारं दिसणंही कोणालाच आवडत नाही. मात्र आपल्याच काही वाईट सवयी (Bad Habits) आपल्याला लवकर वयोवृद्ध बनवत असतात.बर्‍याच लोकांच्या लाईफस्टाईलमुळे (Lifestyle)वेळेआधीच त्यांच्या तोंडावर सुरकुत्या (Wrinkles) पडायला सुरवात होते. अनेक प्रकारच्या क्रिम वापरुन आणि त्वचेची कितीही काळजी(Skin Care)घेतली तरी, चेहरा पूर्वीसारखा होतं नाही. प्रत्येक दिवसागणिक

आपलं वय वाढणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसणार आहे. पण अकाली वृद्धत्वाच्या खूणा दिसायाला लागल्या तर, आपल्यालाही त्रास होतोच. काही वाईट सवयी याचं मोठं कारण ठरतात. म्हणूनच वेळीच आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत.

(मीठ जरा जपून हा सल्ला ऐकला असेल; पण पोटाचा त्रास असेल तर हे असं मीठ जरूर)

अधिक मद्यपान

त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणं आणि डोळ्यांखाली काळी वर्तूळे येणं किंवा सूज येणं हे सगळं जास्त मद्यपान करण्याच्या सवयीमुळे होऊ शकत आणि चेहरा खराब दिसायला लागतो. आपली त्वचा तुकतुकीत आणि चमकदार दिसावी असं वाटत असेल तर आधी मद्यपान करणं लवकरात लवकर बदं करावं लागेल.

(लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO)

पाणी कमी पिणं

बरेच लोक पुरेसं पाणी पित नाहीत. ज्यामुळे थकवा,बद्धकोष्ठता, अशक्तपणा आणि डिहायड्रेशन यासारखे त्रास होत राहतात. तर त्वचा कोरडी होणं,सुरकुत्या आणि डार्क सर्कल होतात. त्यामुळे वय लवकर दिसायला लागतं. तर, कमी पाणी पिण्याची सवय पटकन बदला आणि पुरेसं पाणी प्यायला सुरूवात करा. जास्त पाणी पिण्याची सवय आपल्या त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करेल.

(दररोज ‘या’ भाज्या आणि फळं खा; थायरॉईड येईल नियंत्रणात)

धूम्रपान

धूम्रपान करण्याची सवय देखील आपल्याला अकाली म्हातारं बनवते. धूम्रपान केल्याने त्वचेमध्ये नवीन पेशी बनत नाहीत,ज्यामुळे वय जास्त दिसून येतं.

जास्त साखर खाण

बर्‍याच लोकांना गोड पदार्थ खायला आवडतात.अधिक साखर किंवा ग्लुकोज घेतल्याने कोलेजेन आणि इलेस्टिन कमकुवत होतं. त्वाचा ग्लोईंग आणि चमकदार करण्यात कोलेजन आणि इलॅस्टिन महत्वाची मदत करतात. म्हणूनच जास्त साखर खाण्याची सवय बदलली पाहिजे. 

First published:

Tags: Lifestyle, Skin care