श्रद्धेच्या नावाखाली जेव्हा 70 वर्षांच्या म्हाताऱ्या हत्तिणीला चालायची केली सक्ती

श्रद्धेच्या नावाखाली जेव्हा 70 वर्षांच्या म्हाताऱ्या हत्तिणीला चालायची केली सक्ती

सलग 10 दिवस परेड करताना टिकीरीच्या पाठीवर रंगीबेरंगी चादर आच्छादली होती. तसंच तिच्यावर अंकुश ठेवण्यासाठी टिकीरीच्या पाठीवर एक मुलगाही बसला होता.

  • Share this:

नुकताच वर्ल्ड एलिफंट डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण या उत्साहाला गालबोटही लागलं. टिकीरी नावाच्या 70 वर्षांच्या हत्तिणीचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये टिकीरीवर श्रीलंकेतील परेरा महोत्सवात परेड करण्याची सक्ती करण्यात आली. सलग 10 दिवस परेड करताना टिकीरीच्या पाठीवर रंगीबेरंगी चादर आच्छादली होती. तसंच तिच्यावर अंकुश ठेवण्यासाठी टिकीरीच्या पाठीवर एक मुलगाही बसला होता.

सेव्ह एलीफंट फाउंडेशन या चॅरिटीने त्यांच्या फेसबुक पेजवर टिकीरीचे फोटो शेअर करत एक भावुक मेसेजही लिहिला. या फाउंडेशनने लिहिलेल्या मेसेजनुसार, गोंगाट, कर्कर्श फटाके आणि प्रचंड धुरळ्यात टिकीरीला या परेडमध्ये चालावं लागलं. या उत्सवात लोकांना बरं वाटावं यासाठी तिला प्रत्येक रात्री कित्येक किलोमीटर चालावं लागलं. तिला जड कपडे आणि लाइट्स लावून तयार केलं जातं, जेणेकरून तिची हाडं कोणाला दिसणार नाहीत.

एका रिपोर्टनुसार, सेव्ह एलिफंट फाउंडेशनचे संस्थापक लेक चॅलर्टने म्हटलं की, टिकीरी ही 60 हत्तींपैकी एक आहे ज्यांना श्रीलंकेतील कँडी येथील बुद्ध उत्सव एसला परेरामध्ये सक्तीने भाग घ्यावा लागतो. चॅरिटी प्रमुख म्हणाले की, त्यांना उत्सवातील लोकांची श्रद्धा आणि एकंदरीत होणारा जल्लोष याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण, याचा प्राण्यांना कोणताही त्रास होता कामा नये. याच फाउंडेशनने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘प्रेम करणं, कोणाला इजा न पोहोचवणं, दया आणि करुणेच्या मार्गावर चालणं हाच बुद्धाचा मार्ग आहे. या मार्गाचं पालन करण्याची ही योग्य वेळ आहे.’

एसला परेरा हा बुद्धाचा मोठा उत्सव असतो. श्रीलंकेत हा उत्सव भव्यतेने साजरा केला जातो. परेरा हे स्थळ जगातील सर्वात प्राचीन स्थान तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सेव्ह एलिफंट फाउंडेशन एक थाय नॉन- प्रॉफिट संस्था आहे. ही संस्था थायलंडमध्ये बंदिस्थ असलेल्या हत्तींची देखभाल करतात.

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर व्हा सावधान!

सतत दुखतोय कान, तर हे घरगुती रामबाण उपाय कराच

Instagram Addicted असाल तर या आजारांना देताय निमंत्रण

कामासाठी आणि राहण्याबाबत भारताचं स्थान घसरलं; हा देश आहे अव्वल!

VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या