कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनचा असाही झाला फायदा

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनचा असाही झाला फायदा

कोरोना लॉकडाऊनचा नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम झाला याचा अभ्यास करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : कोरोना महासाथीने मृत्यूचा आलेख दिवसागणिक वाढत असतानाच भारतीयांच्या आरोग्याबाबत एक दिलासादायक बातमी मिळते आहे. कोरोना संक्रमण पसरून नये यासाठी जो लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यामुळे कोरोनापासून बचाव तर झालाच शिवाय भारतीयांच्या आरोग्याला आणखी एक फायदा झाला, तो म्हणजे भारतीयांचं हृदय हेल्दी बनलं आहे.

कोरोनाच्या या परिस्थितीत जीवनशैलीतील बदल झाले. याचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला याबाबत 'हेल्दियन्स'ने सर्वेक्षण केलं. त्यामध्ये हृदयविकाराला कारणीभूत भारतीयांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत घट झाल्याचं दिसून आलं. पुरुषांमध्ये 25.4 टक्के आणि स्रियांमध्ये 17.2 टक्क्यांनी कोलेस्ट्रॉलची पातळी घटली आहे.

कोलेस्ट्रॉलचं घटण्याचं प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये जीवनशैलीत झालेला बदल. लोकांना प्रक्रिया केलेले आणि पाकीटबंद पदार्थ मिळाले नाही. हृदयविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या जंकफूडचं सेवन कमी झालं. घरगुती पदार्थांचं सेवन वाढलं, घरीच बनवलेले पदार्थ लोक खाऊ लागले.

हे वाचा - मास्क लावल्याने शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?

शरीरात कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाचं संतुलन राखणं आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणातील वाढ हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते. या पाहणीत आढळून  आलं. त्यामुळे या लोकांचं हृदयही निरोगी बनलं आहे.

'हेल्दियन्स 'चे संस्थापक आणि सीईओ दीपक सहानी यांनी जीवनशैलीतील छोट्या बदलांचं महत्त्व अधोरेखित केले आहे.  "व्यक्तीच्या आरोग्यासाठी जीवनशैली महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊनमुळे जीवनशैलीतील बदल आरोग्यासाठी कसा परिणामकारक ठरू शकतो हे दिसून आलं आहे. ऐच्छिक किंवा अनैच्छिक स्वरुपाचे सामान्य बदल आरोग्यवर्धक ठरलं," असं सहानी म्हणाले.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या