तुमचं Heart fail होणार आहे; 10 दिवस आधीच तु्म्हाला सावध करणार ब्लूटूथ, वाचवणार तुमचा जीव

तुमचं Heart fail होणार आहे; 10 दिवस आधीच तु्म्हाला सावध करणार ब्लूटूथ, वाचवणार तुमचा जीव

युनिव्हर्सिटी ऑफ उटाह हेल्थ (University of Utah Health) आणि वीए सॉल्ट लेक सिटी हेल्थ केयर सिस्टमच्या (VA Salt Lake City Health Care System) संशोधकांनी हार्ट फेलची (Heart fail) माहिती होण्यासाठी एक असं ब्लूटूथ सेन्सर (blutooth sensor) तयार केलं आहे.

  • Share this:

सॉल्ट लेक सिटी, 29 फेब्रुवारी : हृदय (heart) काम करण्यास सक्षम नसणं म्हणजे हार्ट फेल (heart fail) होणं. हृदयाला पुरेसा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही किंवा शरीराच्या इतर भागांना रक्त पुरवण्यात हृदय सक्षम नसतं. हार्ट फेल असो किंवा हार्ट अटॅक, हृदयाच्या या समस्या अचानक उद्भवतात, लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. त्यानंतर रुग्णालयात नेलं जातं, मात्र अनेकचा परिस्थिती गंभीर असते. त्यातही वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी जर आजूबाजूला कुणी नसेल तर त्या रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. मात्र आता तुमचं हार्ट फेल होणार आहे, हे तुम्हाला आधीच समजलं तर. असं उपकरण संशोधकांनी विकसित केलं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ उटाह हेल्थ (University of Utah Health) आणि वीए सॉल्ट लेक सिटी हेल्थ केयर सिस्टमच्या (VA Salt Lake City Health Care System) संशोधकांनी हार्ट फेलची माहिती होण्यासाठी एक असं ब्लूटूथ सेन्सर तयार केलं आहे. ज्यामुळे तुमचं हार्ट फेल होणार आहे, याची माहिती तुम्हाला 10 दिवस आधीच मिळेल. हे ब्लूटूथ सेन्सर छातीवर चिकटवता येऊ शकतं. हृदयाची गती, झोपेची गुणवत्ता, शरीराची स्थिती या सर्वांवर लक्ष ठेवेल.

Pic credit - Charlie Ehlert/University of utah

Pic credit - Charlie Ehlert/University of utah

हार्ट फेल झालेल्या 68 वर्षांच्या 100 रुग्णांवर याची चाचणी करून पाहण्यात आली. या व्यक्तींनी 3 महिने हे सेन्सर आपल्या छातीवर लावलं.  80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये या उपकरणाची चाचणी यशस्वी ठरली. युनिव्हर्सिटी ऑफ उटाह हेल्थ आणि वीए साल्ट लेक सिटी हेल्थ केयर सिस्टमच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपात्कालीन स्थिती कमी करता येऊ शकते.

Pic credit - Charlie Ehlert/University of utah

Pic credit - Charlie Ehlert/University of utah

प्रमुख संशोधक डॉ. जोसेफ स्टेलिक म्हणाले, "या उपकरणाच्या मदतीने रुग्णाला आता रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे, याचे संकेत आधीच मिळू शकतात. वेळेआधीच हृदयामध्ये होणारे बदल समजले तर त्यावर लवकरात लवकर उपचार करता येऊ शकतात. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते"

First published: February 29, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या