मुंबई, 21 मार्च : वाढत्या वयासोबत महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. अनेक वेळा वेगवेगळ्या कारणामुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्यही कमकुवत होत जाते. उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग, वाल्व रोग आणि मधुमेह मेल्तिस हे याचे कारण बनते. मात्र काहीवेळा रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
झी न्यूज हिंदीने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे. त्यानुसार, हृदयविकाराची काही लक्षणं मेनोपॉजचे परिणाम समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. म्हणूनच मेनोपॉजचे परिणाम कोणते आणि हृदयविकाराचे लक्षण कोणते हे ओळखण्यात चूक करू नये. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षण ओळखण्यात विलंब झाल्यास आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते.
'नाचणी'ला घेऊ नका हलक्यात, डायबिटीजसह 'या' भयंकर आजाराचा धोका करते कमी
शरीरात इस्ट्रोजेन असल्यामुळे महिलांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारापासून नैसर्गिक संरक्षण मिळते. एस्ट्रोजेन एचडीएल म्हणजेच गुड कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. आणि एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. मात्र रजोनिवृत्तीनंतर, शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.
स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती 40 वर्षांनंतर कधीही होऊ शकते, परंतु बहुतेकदा ते स्त्रिया 50 वर्षांच्या असताना होतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळीत अचानक बदल झाल्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे हृदयाशी संबंधित कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.
हार्ट फेल झाल्यास महिलांमध्ये दिसतात ही लक्षणं
- महिलांना हृदयविकाराचा झटका आल्यास मान आणि पाठीच्या वरच्या भागात दुखणे, अपचन, चक्कर येणे, मळमळ आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. स्त्रिया अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास विलंब होतो.
Millets Benefits : सध्या चर्चेत असलेल्या Millets मध्ये कोणकोणतं धान्य येतं?
- हृदयविकाराचा झटका आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना जाणवणारी लक्षणे सारखीच असू शकतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये महिलांना हृदयात धडधडणे, रात्री घाम येणे, छातीत अस्वस्थता, थकवा, अस्वस्थता आणि छातीत दुखणे जाणवू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle