मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मध खाण्याचा हार्ट अटॅक, स्ट्रोकवर असा होतो परिणाम; संशोधकांनी अभ्यासानंतर केला दावा

मध खाण्याचा हार्ट अटॅक, स्ट्रोकवर असा होतो परिणाम; संशोधकांनी अभ्यासानंतर केला दावा

मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या संशोधकांनी कच्च्या मधावर एक अभ्यास केला, ज्यामध्ये 1800 लोकांचा समावेश होता. यामध्ये 18 ट्रायल झाल्यात. मध खाणाऱ्यांमध्ये ब्लड शुगर लेव्हल आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आलं.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील सुमारे 1.28 अब्ज लोकांना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. परंतु दुर्दैवाने त्यापैकी 46 टक्के लोकांना हे माहीतच नाही की त्यांना बीपीचा आजार आहे. डब्ल्युएचओच्या मते, हृदयविकारामुळे दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू होतो. पण कॅनडामध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार मधाचं सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. म्हणजेच रोज काही चमचे मध खाल्ल्यास आपलं डॉक्टरकडे जाणं कमी होऊ शकतं. विशेष म्हणजे मधामध्ये 80 टक्के साखर असते, तरीही तो रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतो.

मधामुळे ब्लड शुगर होते कमी

ब्रिटिश वेबसाईट मेट्रोवर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे, की मध रक्तातील साखर संतुलित ठेवतो आणि कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढू देत नाही. या दोन्ही गोष्टी मेटाबॉलिक हेल्थसाठी आवश्यक आहेत. कार्डिओमेटाबॉलिक डिसिज हा लाइफस्टाइलशी संबंधित एक सामान्य आजार झाला आहे. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, डायबेटिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारखे आजार होतात. या आजारांना वेळीच रोखता येतं. एक्सपर्टच्या मते, योग्य लाइफस्टाईलनुसार आहारात साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास टाइप 2 डायबेटिस, हार्ट डिसिज आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हे आजार टाळता येऊ शकतात.

मधात असते दुर्मिळ प्रकारची साखर

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या संशोधकांनी कच्च्या मधावर एक अभ्यास केला, ज्यामध्ये 1800 लोकांचा समावेश होता. यामध्ये 18 ट्रायल झाल्यात. मध खाणाऱ्यांमध्ये ब्लड शुगर लेव्हल आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली, तसंच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली, असं अभ्यासात आढळून आलं. या ट्रायलमध्ये सहभागी सदस्यांनी हेल्दी डाएट घेतलं आणि साखर फक्त 10 टक्के कमी केली. या व्यक्तींना दररोज सरासरी 40 ग्रॅम म्हणजेच दोन चमचे मध देण्यात आला होता. यांना 8 आठवडे रोज मधाचं सेवन करण्यास सांगितलं होतं.

हे वाचा - सॅनिटरी पॅड्समुळे कॅन्सर, वंध्यत्वाचा धोका; संशोधकांचा खळबळजनक दावा

केवळ कच्च्या मधाने हे फायदे मिळतात, असं अभ्यासात आढळून आलं. त्याचबरोबर अभ्यासात असंही म्हटलं आहे की, मध 65 डिग्रीपर्यंत गरम केले तरी त्यापासून कोणताच फायदा होत नाही. मधामध्ये दुर्मिळ प्रकारचं कंपोझिशन असतं. यामध्ये विविध प्रकारची साखर, प्रोटिन, ऑरगॅनिक अॅसिड आणि बायो अॅक्टिव्ह कंपाउंड आढळतात, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅनडामधील फॅकल्टी ऑफ मेडिसिनचे सीनिअर प्रोफेसर तौसिफ खान यांनी सांगितलं.

First published: