मुंबई, 29 एप्रिल : आजकाल अनेक प्रकारचे चहा तसंच पेय बाजारात पाहायला मिळतात. याशिवाय अनेकजण आता आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. त्यासाठी नवनवीन काढे, रस, चहा लोक पितात. पण एक चहा असा आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह वजन घटवण्यासही (weight loss) फायदेशीर ठरतो. ओव्याचा हा चहा (celery tea) अगदी साधा सोपा आहे. ओव्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. ओव्यात प्रोटीन, फॅट आणि फायबर सोबतच कॅल्शियम, थायमिन, राइबोफ्लेविन, आयर्न असे गुण असतात.
सध्या कोरोनाचा बिकट (corona pandemic) काळ सुरू आहे प्रत्येकजण स्वत:ची विशेष काळजी घेताना दिसतो. पण लॉकडाउनमुळे अनेकजण घरातच अडकून पडले आहेत, त्यामुळे अनेकांना वजन वाढण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे हा ओव्याचा चहा (healthy tea) नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
(वाचा - तुम्हीही लहान मुलांना मारता किंवा ओरडता का? मुलांवर असा होऊ शकतो परिणाम)
पचनसंस्था होईल मजबूत (digestive system) -
चांगल्या आरोग्यासाठी पचन व्यवस्थित होणं गरजेचं असतं. पचनक्रिया सुरळीत असेल, तर सहसा आजार लवकर जवळ येत नाहीत. ओवा पचनक्रिया सुधराण्यास मदत करतो.
वजन कमी करण्यास होते मदत (weight loss) -
ओवा हा वजन घटवण्यासाठीही उपयुक्त ठरतोय. ओव्यात फायबरचे गुणधर्म असतात, जे फॅट लॉस करतात आणि वजन नियंत्रित राहतं.
सर्दी – खोकल्यापासून मिळेल आराम (cold and cough) -
ओव्याचा चहा शरीरासाठी फारच फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यासोबतच सर्दी - खोकल्यासारखे आजारही बरे होतात. तसंच सर्दीमुळे नाक बंद होत असेल, तर नाक खुलं होतं आणि श्वास घेण्यासही त्रास होत नाही.
चहा बनवण्याची कृती (tea recipe) -
ओव्याचा हा हेल्दी चहा बनवण्यासाठी ओव्याचं पाणी बनवून त्यात थोडी ग्रीन टी मिसळावी. त्यानंतर थोडं लिंबू मिसळून मिश्रण उकळून घ्यावं. नंतर गाळून हा चहा प्यावा. ओव्यात अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात, यामुळे शरीरातील नको असलेले कोलेस्ट्रॉल निघून जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle