ही भाजी खाल्ल्याने वजन होतं कमी, डोळेही राहतात चांगले

काही भाज्या आपण निव्वळ आवडत नाहीत म्हणून खात नाही, पण तीच भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केली तर पोटात जाते आणि त्यापासून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहावं लागत नाही... अशीच एक आवडती -नावडती पण बहुगुणी भाजी...

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 10:20 PM IST

ही भाजी खाल्ल्याने वजन होतं कमी, डोळेही राहतात चांगले

मुंबई : निरोगी राहण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी दररोज भाज्या, फळं खाणं  आवश्यक आहे. भाज्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. जीवनसत्त्व, प्रथिनं आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या विविधरंगी आणि विविध प्रकारच्या भाज्या आपल्या आहारात समाविष्ट केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. आपण आवडीने भाजी खातो, पण त्याचे फायदे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात किंवा एखादी भाजी आवडत नाही म्हणून ती खाणं टाळलं जातं. अशाने त्या भाजीत असणाऱ्या गुणसत्वांचा शरीराला लाभ मिळत नाही. आता भेंडीचं उदाहरण पाहा. भेंडीची भाजी आणि भरलेल्या भेंडीचा प्रकार अनेकांना आवडतो. चवीसोबतच भेंडी आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

(वाचाः नियमित सेवन करा मोड आलेलं कडधान्य; 'हे' आहेत फायदे)

भेंडीमध्ये जीवनसत्वं, खनिजं आणि अनेक पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात. भेंडीत फायबर असतात. ते अन्न पचनासाठी मदत करतात. यामुळे पोटफुगी, पोट जड होणं, अपचन, पोट साफ न होणं, दुखणं आणि गॅस सारख्या समस्या होत नाहीत. यामधील लो ग्लाइसेमिक इंडेक्स शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत करतात. फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलला नियंत्रित करतं, ज्याने हृदयरोगाचा धोका कमी राहतो.

वजन कमी करण्यासाठी भेंडी मदत करते. भेंडी खाल्ल्याने शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजेच, चयापचय व्यवस्थित राहण्यास मदत होते. परिणामी, जास्तीचं वजन वाढत नाही. भेंडीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकतं.

Loading...

(वाचाः पावसाळ्यात काविळ होऊ नये म्हणून घ्या काळजी; करा 'हे' घरगुती उपाय)

भेंडीमध्ये अ जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिड्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे डोळे चांगले राहतात. मोतीबिंदूपासून देखील तुमचा बचाव होऊ शकतो. यामधील बीटा-कॅरोटीन, अँटीऑक्सीडंट्स त्वचेचं सौंदर्य राखण्यास मदत करतात.

याशिवाय व्हिटॅमिन-सी असल्यामुळे अँटीआक्सिडेंट भरपूर असते. ज्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करतं. भेंडीला आहारात सामील केल्याने सर्दी,पडसं, खोकला अशा साथींपासून दूर राहू शकाल.

बाहेर गाजर ज्यूस पिण्याआधी हा VIDEO पाहा...पायाने धुतली जातात ज्युसची गाजरं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...