Home /News /lifestyle /

पावसाळ्यात खावं की नाही दही; पाहा काय सांगतात डॉक्टर

पावसाळ्यात खावं की नाही दही; पाहा काय सांगतात डॉक्टर

दही रायता देखील प्रचंड आवडीने खाल्ला जातं.

दही रायता देखील प्रचंड आवडीने खाल्ला जातं.

दही (Yogurt) आवडत असलं तरी, पावसाळ्यात (Monsoon) खाताना मात्र मनात सर्दी, खोकला होण्याची भीती असते.

    नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल (Change In Diet) करतो. उन्हाळ्यामध्ये (Summer) ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये (Monsoon) गारठा वाढत असल्यामुळे शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. त्याबरोबरच उन्हामध्ये खाल्ले जाणारे ते थंड पदार्थ पावसाळ्यात आहारातून  (Diet) बाद होतात. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून दररोज खाल्लं जाणारं दही किंवा ताक पावसाळ्यात (Yogurt Or Buttermilk In Monsoon)मात्र खावं की नाही अशी शंका मनात यायला लागते. दही हे थंड प्रकृतीचं असल्यामुळे पावसाळ्यात दही खाल्ल्यास त्याचे साइड इफेक्ट (Side Effect) होऊन सर्दी, खोकला, ताप असे त्रास होण्याची भीती मनामध्ये असते. ज्यांना दररोज दही (Curd) खायला आवडतं. त्यांना मात्र पावसाळ्यात अडचण होते. पावसाळ्यात आहाराकडे जास्त लक्ष (More Attention to Diet)द्या असं आयुर्वेद (Ayurveda) सांगतो. तर आयुर्वेदानुसारच पावसाळ्यामध्ये दही खाऊ नये असंही सांगितलं गेलं आहे. कारण यामुळे वात आणि पित्त संचय वाढतो आणि आरोग्य संबंधी त्रास सुरू होतात. मात्र, डॉक्टारांच्यामते  दह्यामध्ये प्रोबायोटिक्स(Probiotics) असल्याने पावसाळ्यात सुद्धा दही खाणं आवश्यक आहे. (बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा 'Breast Feeding') पावसाळ्यात दही खाण्याची पद्धत दही खाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते. दिवसाची सुरुवात 1 वाटी दह्याने करू शकतो. यामुळे आपली पचन व्यवस्था चांगली राहते. दह्यात प्रोबायोटिक्स असल्याने आणि त्यात कॅलरीज कमी असल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. याशिवाय साध्या दह्यात काही ड्रायफ्रुट्स घालून खाऊ शकता. (अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर) ताक ताक किंवा छाछ हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ताक हे उत्तम पाचक मानलं जातं. कोणताही जड पदार्थ खाल्ल्यावर चांगलं पचन होण्यासाठी ताक जरूर प्यावं. (अंड रोज खावं खरं; पण ऑम्लेट नव्हे तर असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा) दही रायता दही रायता देखील प्रचंड आवडीने खाल्ला जातं. साखर घातलेलं गोड दही खाण्यापेक्षा दही रायता बनवून खावं. यामध्ये खारी बुंदी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे पदार्थ घालून त्याची चव वाढवता येऊ शकते. दुपारच्या वेळी अशा प्रकारचं रायता खाण्याने फायदा होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Tasty food

    पुढील बातम्या