कॉस्मेटिक्सची गरज नाही; नैसर्गिकरित्या सुंदर, तरुण दिसण्याचे 6 सिक्रेट

कॉस्मेटिक्सची गरज नाही; नैसर्गिकरित्या सुंदर, तरुण दिसण्याचे 6 सिक्रेट

अनेक वर्ष तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी (To stay young and beautiful) फक्त स्किन केअर करून चालणार नाही. तर त्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.

  • Share this:

दिल्ली, 08 मे : आजच्या काळात बदलेलं लाईफस्टाईल (Lifestyle), वाढतं ऊन, धूळ, प्रदूषण यामुळे आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार ठेवणं फार कठीण झालेलं आहे. यामुळेच कायम तरुण आणि संदर दिसण्याची (Stay young and beautiful for long time) इच्छा असलेल्यांनी आपल्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं.

काही जणांचा असा समज असतो की केवळ स्किन केअर केल्यास ते स्वत:ला सुंदर ठेऊ शकतात. पण क्लिन, स्मूद आणि ग्लोईंग स्किनसाठी केवळ स्किन केअरच नाही तर, आपल्या डाएटमध्येही बदल करावा लागतो (You also have to pay attention to your diet). त्याबरोबर काही गोष्टींचा समावेश आपल्या रुटीनमध्ये करायला हवा (Many things will have to be included in your routine).

हे वाचा - कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश

जर जास्त काळ सुंदर आणि तरुण दिसायचं असेल तर काही रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील.

डेली रूटीन

काही जणांचं डेली रूटीन (Daily Routine) ठरलेलं नसतं. कोणतीही गोष्ट कोणत्याही वेळी करतात. त्यामुळे आपलं रूटीन बनवा. झोपणं, उठणं, जेवण यांच्या वेळा ठरवा आणि फॉलो करा. अवेळी गोष्टी करण्याने आपल्या शरीरावर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी रूटीन सेट करा.

तणाव कमी करा

मेंटल स्ट्रेस (Mental stress) त्वचेवर परिणाम करतो. जास्त तणावात जगणाऱ्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. अकाली सुरकुत्या आल्यास त्वचा लूज होते. त्यामुळे स्वत:ला पॉझिटीव्ह ठेवा. त्यामुळे तुमची मेंटल आणि फिजीकल हेल्थ चांगली राहिल.

मेडिटेशन करा

मेडिटेशनने (Meditation)  त्वचा चमकदार आणि बराच काळ तरूण राहते. मेडिटेशनने आपल्यात पॉझिटीव्हिटी देखील वाढते आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊन, चेहरा सुंदर दिसतो.

हेल्दी डाएट

आपला चेहरा सतेज राहण्यासाठी आणि त्वचा टाईट राहण्यासाठी जंक फूड (Junk Food) टाळा आणि आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि ड्रायफ्रुट यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

हे वाचा - Corona vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?

जंक फूडचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो,त्यामुळे पिंपल्स आणि सुरकुत्यादेखील येतात.

हायड्रेशन आवश्यक

चांगल्या त्वचेसाठी हायड्रेशन (Hydration) आवश्यक आहे. त्यामुळे थोड्याथोड्य़ा वेळाने पाणी प्या. शरीरात पाणी जेवढं जास्त असेल तेवढी त्वचा चांगली दिसेल. पाणी जास्त पिणं शक्य नसेल तर, ज्युस, सुप, नारळपाणी, लिंबूपाणी यासारखे पदार्थ घ्या. त्यामुळे शरीरात पाण्याची मात्रा वाढेल.

पूर्ण झोप

काही लोक मोबाईल (Mobile) आणि कॉम्प्युटरवर (Computer) जास्त वेळ काम करतात. रात्री देखील उशिरापर्यंत मोबाईल, कॉम्प्युटर पाहत बसतात त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं यायला लागतात. त्वचाही सैल होते. त्यामुळे स्किन चांगली राहण्यासाठी आठ तास पूर्ण आणि शांत झोप घ्यावी.

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 11:19 PM IST

ताज्या बातम्या