मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kidney Health : काही हेल्दी Nutrients करू शकतात किडनी डॅमेज, जपून करा यांचा वापर

Kidney Health : काही हेल्दी Nutrients करू शकतात किडनी डॅमेज, जपून करा यांचा वापर

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही हेल्दी न्यूट्रिएंट्स किडनी डॅमेज करू शकतात. होय, हे अगदी बरोबर आहे. चला तर मग पाहूया ते न्यूट्रिएंट्स कोणते आहेत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही हेल्दी न्यूट्रिएंट्स किडनी डॅमेज करू शकतात. होय, हे अगदी बरोबर आहे. चला तर मग पाहूया ते न्यूट्रिएंट्स कोणते आहेत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही हेल्दी न्यूट्रिएंट्स किडनी डॅमेज करू शकतात. होय, हे अगदी बरोबर आहे. चला तर मग पाहूया ते न्यूट्रिएंट्स कोणते आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 फेब्रुवारी : किडनी हा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हे अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. त्याचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शरीरातील विषारी आणि द्रव पदार्थ मूत्राद्वारे काढून टाकणे. यासोबतच शरीरातील मीठ, आम्लचे प्रमाणही नियंत्रित ठेवते. मूत्रपिंड लहान रक्तवाहिन्यांनी भरलेले असतात, जे रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करण्यास आणि शरीरातून काढून टाकण्यास मदत करतात.

एखाद्याला किडनीचा जुनाट आजार असल्यास, मूत्रपिंड जसे पाहिजे तसे रक्त फिल्टर करू शकत नाही. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त कचरा जमा होतो. अनेक कारणांमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्यास किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत हे दोन्ही आजार आटोक्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

वेट लॉससोबत शरीरातील हे भाग मजबूत ठेवते थंड दूध, वाचा अद्भुत फायदे

अन्यथा त्याचा किडनीवर विपरीत परिणाम होतो. मात्र केवळ हे आजारच किडनी डॅमेज करू शकतात असे नाही. किडनी हेल्दी राहणं खूप प्रमाणात आपल्या आहारावरही अवलंबून असतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही हेल्दी न्यूट्रिएंट्स किडनी डॅमेज करू शकतात. होय, हे अगदी बरोबर आहे. चला तर मग पाहूया ते न्यूट्रिएंट्स कोणते आहेत. याबद्दल सविस्तर माहिती आजतकच्या बातमीमध्ये दिलेली आहे.

सोडियम : सोडियम आपल्या शरीरातील पाण्याची आणि खनिजांची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. सोडियम आपल्या शरीरात कमी प्रमाणात आढळतो. पण जर त्याचे प्रमाण शरीरात जास्त झाले तर किडनीला खूप नुकसान होऊ शकते. जेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असते, तेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि किडनीला हानी पोहोचवू लागते.

फॉस्फरस : प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांमध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात आढळतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फॉस्फरसचे प्रमाण मर्यादित ठेवावे. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, ज्या गोष्टींमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते ते किडनीच्या आरोग्यासाठी खूप वाईट मानले जाते. यावरून असेच कळते की, उच्च फॉस्फरस सामग्रीचे सेवन केल्याने किडनी आणि हाडांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

प्रोटीन : जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास रक्तामध्ये उच्च पातळीचे ऍसिड तयार होते, जे तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक ठरू शकते. या स्थितीला इंट्राम्युरल हायपरटेन्शन किंवा प्रोटीन्युरिया म्हणतात. प्रोटिन्स आपल्या वाढीसाठी आणि अवयवांच्या दुरुस्तीसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. परंतु मूत्रपिंड निरोगी ठेवायचे असेल तर आपण मर्यादित प्रमाणात प्रोटीन घेणे आवश्यक आहे.

Green Tea : ग्रीन टीही करू शकते कॅन्सरपासून बचाव, फक्त बनवताना टाका हे पदार्थ

पोटॅशियम : पोटॅशियम पेशींमध्ये द्रव संतुलन राखण्याचे काम करते. त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. मात्र पोटॅशियमचे जास्त प्रमाण तुमच्या किडनीसाठी हानिकारक ठरू शकते. पोटॅशियम फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंडावर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव पडतो. त्यामुळे ज्या लोकांना किडनीशी संबंधित कोणतीही समस्या आहे त्यांनी पोटॅशियमचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle