16 आॅक्टोबर : सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह दिसतोय. दिवाळीत आपण छान सजतो, नटतो. अशा वेळी केसही सुंदर दिसायला हवेत. बदलत्या हवामानामुळे केसांमध्ये बदल होणे साहजिकच आहे आणि चमकदार, निरोगी केसांसाठी केमिकलवाले प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. केस मुलायम आणि दाट होण्यासाठी पाहू या घरगुती उपाय-
जेव्हा केस कोरडे होतात...
कृती - पाच मोठे चमचे बेसन आणि दही दोन मोठे चमचे घ्या. त्यात ऑलिव्ह ऑइल मिस्क करा. या मिश्रणाला केसांना लावून 20 मिनिटे ठेवा. आता केस शॅम्पूने धुवा. केसांना कंडिशन करायला विसरू नका.
फायदा - बेसन तुमच्या केसांना मुळांपासून मजबूत करेल, दही आणि ऑलिव्ह ऑईल केसांमधे ओलावा निर्माण करतील. केस चमकदार होतील.
अशी घ्या तेलकट केसांची काळजी
कृती - दोन मोठे चमचे बेसन घ्या. नारळाच्या दुधामध्ये मेथीचे दाणे मिस्क करा. या मिश्रणाने केसांचं मालिश करा आणि एक तासासाठी केस मोकळे सोडा. त्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुऊन घ्या.
फायदा - केसांचा चिकटपणा निघून जाईल. केस चमकदार आणि मजबुत होतील.
साध्या केसांची निगा राखण्यासाठी
कृती - अंड्याच्या पांढऱ्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन आणि योग्य प्रमाणात बदाम पावडर मिस्क करा. आपल्या केसांना लावून केस अर्ध्या तासासाठी मोकळे सोडा. यानंतर केस धुऊन घ्या.
फायदा - साध्या केसांची योग्य काळजी घेतली तर केसांची गुणवत्ता आणखी वाढू शकते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा