Home /News /lifestyle /

Health Tips: यूरिक अ‌ॅसिड वाढतं तेव्हा चुकूनही खायचे नसतात हे हेल्दी फूड्स; त्रास जास्तच वाढत जातो

Health Tips: यूरिक अ‌ॅसिड वाढतं तेव्हा चुकूनही खायचे नसतात हे हेल्दी फूड्स; त्रास जास्तच वाढत जातो

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे आणि शरीराच्या प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे. आयुर्वेदामध्ये गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट असे सहा प्रकारच्या चवींचे वर्णन केले आहे. एखाद्याने आपल्या शरीराच्या प्रकृतीबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर स्वतःसाठी आहार चार्ट तयार करावा.

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे आणि शरीराच्या प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे. आयुर्वेदामध्ये गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट असे सहा प्रकारच्या चवींचे वर्णन केले आहे. एखाद्याने आपल्या शरीराच्या प्रकृतीबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर स्वतःसाठी आहार चार्ट तयार करावा.

किडनी यूरिक अॅसिड (uric acid) काढू शकत नसेल, तर त्यामुळे शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अनेक आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहेत, जे अशा परिस्थितीत न खाण्याचा सल्ला दिला जातो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 23 मे : निरोगी जीवन जगण्यासाठी सकस अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. साधारणपणे, लोक आहारात विविध आरोग्यदायी अन्न घटकांचा समावेश करतात. परंतु, कोणत्याही हेल्दी फूडचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, हे प्रामुख्याने आपल्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. निरोगी अन्न एका व्यक्तीला फायदेशीर ठरू शकते तेच दुसऱ्याला कदाचित हानीकारक ठरू शकते. यूरिक अ‌ॅसिड वाढलेले असताना देखील असंच होतं. युरिक अ‌ॅसिड हे एक प्रकारचे रसायन आहे. वास्तविक, जेव्हा आपले शरीर अन्नपदार्थांमध्ये असलेल्या प्युरिनचे विघटन करते, तेव्हा युरिक अ‌ॅसिड शरीरात विरघळते. त्यानंतर, ते मूत्रपिंडांद्वारे बाहेर पडते. पण जर किडनी यूरिक अॅसिड काढू शकत नसेल, तर त्यामुळे शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अनेक आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहेत, जे अशा परिस्थितीत न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा खाद्यपदार्थांविषयी हर जिंदगीमध्ये माहिती देण्यात आली आहे. प्युरीन समृद्ध अन्न - यूरिक अ‌ॅसिड आणि प्युरिन यांचा थेट संबंध आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या शरीरात यूरिक अ‌ॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही मांस, विशेषतः अवयवयुक्त मांसासारखे प्युरीन युक्त अन्न पूर्णपणे टाळावे. या काळात तुमच्या शरीरातील प्युरीन विघटन करण्याची क्षमता खूप कमी झाली आहे आणि त्यामुळे प्युरीन युक्त अन्न सेवन केल्याने शरीरातील युरिक अ‌ॅसिडची पातळी आणखी वाढेल. डाळी जपून खा - कडधान्ये ही प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानली जाते आणि म्हणूनच बहुतेक लोक डाळींचे सेवन करण्यास प्राधान्य देतात. एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते. परंतु, त्यांच्यासोबत एक समस्या अशी आहे की, त्यामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्या शरीरातील यूरिक अ‌ॅसिडची पातळी वाढू शकते. तथापि, येथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण आपल्या आहारातून कडधान्ये पूर्णपणे वगळू नयेत. त्याचा वापर कमी करायला हवा. तुम्ही दिवसभरात एक ते दोन वाट्या कडधान्ये सहज खाऊ शकता, पण यापेक्षा जास्त डाळी खाणे टाळा. हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी सीफूड नको - मांसाहारी असाल आणि सीफूड आवडत असतील किंवा तुम्ही किनारी भागात राहत असाल तर तुम्ही सीफूडपासून काही काळ दूर राहावे लागेल. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास मासे, कोळंबी आणि ऑयस्टर इत्यादी सीफूड खाल्ल्याने शरीरातील समस्या वाढू शकतात. हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या दारू - शरीरात यूरिक अॅसिडची पातळी जास्त असताना अल्कोहोलचे सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते. वास्तविक, जेव्हा तुम्ही या स्थितीत अल्कोहोल घेता तेव्हा ते रक्तातील यूरिक अ‌ॅसिडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. अल्कोहोल ऐवजी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाण्याच्या जास्तीमुळे लघवी पातळ होण्यास मदत होते. अशा प्रकारे, शरीरातील यूरिक ऍसिड बाहेर पडणे सोपे होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Health, Health Tips

    पुढील बातम्या