कसा ठेवायचा छोट्यांचा फिटनेस?

कसा ठेवायचा छोट्यांचा फिटनेस?

मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी काही खास टिप्स -

  • Share this:

10 एप्रिल : हिरव्या भाज्या आणि मोड आलेलं धान्य मुलांना अजिबात आवडत नाही. पण मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी हेल्थी फुड फार गरजेचं आहे. त्यामुळे मुलांच्या आहारात कोणते पदार्थ असले पाहिजेत याकडे लक्ष देणं महत्त्वाचं. जिमपिक (ऑनलाइन फिटनेस प्लॅटफॉर्म)च्या आहार तज्ज्ञ सुजेता शेट्टी यांनी मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.

1. गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती तसंच भरडलेलं धान्य किंवा ब्राउन ब्रेडचा समावेश लहान मुलांच्या रोजच्या आहारात करावा. त्यामुळे मुलांना पुरेसं व्हिटॅमिन बी आणि फायबर मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य तंदुरुस्त होते आणि अन्नपचन होण्यास मदतसुद्धा होते. मोड आलेलं धान्य, सोयाबीन, चणे रोजच्या रोज मुलांना खायला द्या.

2. मासे, अंड, मटार, दूध, फळ, मटण, सोया इत्यादी पदार्थांमध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मुलांनाही असे निरनिराळे पदार्थ खायला आवडतात. अशा प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

3. मुलांच्या आहारात जर फळं आणि पालेभाजा महत्त्वाच्या असतात. फळांचा ज्युस सुद्धा मुलांना द्या. पण बाजारातील डबाबंद फळांचा ज्युस मुलांना देऊ नका. कारण त्यात साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. फळांचे ज्युस घरी बनवून त्यात साखर न टाकताच मुलांना द्या.

४. कमी फॅटचे डेअरी प्राॅडक्ट म्हणजेच दूध, दही, पनीर इत्यादी पदार्थ शरीराला कॅल्शियम पुरवण्यास मदत करतात. त्यामुळे हाडेसुद्धा मजबुत बनतात. मुलांसाठी गाय आणि बकरीचं दूध जास्त फायदेशीर असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 04:34 PM IST

ताज्या बातम्या