आता हेल्दी कॉफी प्या; फक्त एक पदार्थ मिसळा आणि 5 समस्यांपासून सुटका मिळवा

आता हेल्दी कॉफी प्या; फक्त एक पदार्थ मिसळा आणि 5 समस्यांपासून सुटका मिळवा

कॉफीमध्ये (Coffee) इतर काही मिसळणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र थंडीत फक्त एक पदार्थ तुम्ही कॉफीत मिसळलात तर तुमची कॉफी हेल्दी बनेल आणि हा पदार्थ आहे दालचिनी (Cinnamon).

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : हेल्दी टी (Healthy tea) तुम्ही आतापर्यंत पित आलात. मग तो ग्रीन टी असो, मसाला चहा असो किंवा फक्त आलं, वेलची, तुळस असे काहीतरी आरोग्यदायी पदार्थ घालून बनवलेला चहा असतो. आपल्या आरोग्याच्या जशा समस्या असतात, तसं आपण चहामध्ये त्या समस्येवर फायदेशीर असा पदार्थ टाकून त्या चहाचा आस्वाद घेतो. मात्र तुम्ही कॉफी प्रेमी असाल तर आता तुम्हालाही आता हेल्दी चहाप्रमाणे हेल्दी कॉफी (Healthy coffee) पिता येणार आहे. यासाठी तुमच्या कॉफीत फक्त एक पदार्थ टाकण्याची गरज आहे आणि हा पदार्थ आहे दालचिनी (Cinnamon).

थंडीत सर्वाधिक वापरली जाणारी दालचिनी खूप हेल्दी आहे. जर ही दालचिनी तुम्ही कॉफीत टाकून प्यायल्यात तर त्यामुळे फक्त तुमच्या कॉफीला फ्लेव्हरच येणार नाही तर ती हेल्दीदेखील बनेल. दालचिनी टाकलेला कॉफी तुम्ही प्यायल्यात तर त्याचे काय फायदे होतील ते जाणून घेऊयात.

ब्लड शुगर नियंत्रणात राहतं

कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल योग्य राहतं. दालचिनीची चव गोड असते, त्यामुळे तुम्हाला कॉफीत जास्त साखर टाकायची गरज पडत नाही. दालचिनी घातलेली कॉफी प्यायल्यानंतर शरीरातील इन्सुलिन नियंत्रित होतं.

वजन कमी होतं.

दालचिनी भूक शमवण्याचं काम करते. कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्यास पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक शांत होते. अचानक भूक लागल्यानंतर तुम्ही मग बाहेरचं काही खात नाही, परिणामी वजन कमी होतं.

हेदेखील वाचा - 'हे' ड्रिंक्स कमी करतील तुमचं वाढलेलं  Blood Pressure

सर्दी-तापावर फायदेशीर

दालचिनीमध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल घटक असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. तसंच दालचिनीत अँटिइन्फ्लेमेटरी घटकही असतात, जे फ्लूमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम देतात.

हृदयासाठी हेल्दी

दालचिनी हृदयासंबंधी आजार आणि समस्यांचा धोका कमी करते. जर तुम्ही सामान्य प्रमाणात दालचिनी आणि कॉफीचं सेवन केलं तर हृदयाच्या बहुतेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल.

त्वचेसाठी फायदेशीर

कॉफीमध्ये पॉलिफेनॉल्ससारखे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या त्वचेचं नुकसान होऊ देत नाही. कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्यास अँटिऑक्सिडंटची मात्रा वाढते आणि तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसते.

हेदेखील वाचा - थंडीत ताप, खोकल्याने हैराण, 'हा' मसाला देईल आराम

सूचना - हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

First published: February 18, 2020, 4:31 PM IST

ताज्या बातम्या