Home /News /lifestyle /

Breakfast For Lose Weight : वाढत्या वजनामुळे तुम्हीही त्रस्त आहात? नाश्त्यात घ्या हे हेल्दी पदार्थ

Breakfast For Lose Weight : वाढत्या वजनामुळे तुम्हीही त्रस्त आहात? नाश्त्यात घ्या हे हेल्दी पदार्थ

न्याहारी हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते. तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट आणि वजन कमी करणाऱ्या पदार्थांबद्दल संभ्रमात असाल तर सकाळी कोणत्या गोष्टी खाऊ शकता याबाबत (Breakfast For Lose Weight) जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी तुम्ही जर आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतलात, तर ते तुम्हाला भरपूर नाश्ता करण्यास सांगतील. वजन कमी करण्‍यासाठी दिवसभरातील तुमच्‍या जेवणात सकाळचा नाश्ता दणदणीत असणे आवश्‍यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, कोणतेही पदार्थ खाऊन पोट भरावे. हेल्थ शॉटने दिलेल्या माहितीनुसार, न्याहारी हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते. तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट आणि वजन कमी करणाऱ्या पदार्थांबद्दल संभ्रमात असाल तर सकाळी कोणत्या गोष्टी खाऊ शकता याबाबत (Breakfast For Lose Weight) जाणून घेऊया. नाश्त्यात या गोष्टींचा समावेश करा 1. दही सकाळी नाश्त्यात (Breakfast) दही खावे. यामुळे तुमच्या शरीराच्या अनेक गरजा पूर्ण होतील, शिवाय तुमचे वजनही वाढणार नाही. हवं तर दह्यासोबत रोटी खाऊ शकता. तुम्ही दही शेक बनवून पिऊ शकता. 2. उपमा उपमामध्ये भरपूर फायबर असतात जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते. उपमाची नाश्त्यासाठी निवड करू शकता. यामुळे नैसर्गिकरित्या चरबी कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल देखील वाढते. 3. अंडी नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश हा तुमच्यासाठी आरोग्यदायी पर्याय असेल. अंड्यांमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन वाढत नाही आणि शरीर निरोगी राहते. हे वाचा - जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा भयंकर परिणाम; या आजारांचा वाढतो धोका 4. मूग डाळ चिला मूग डाळ चिलामध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. फायबर व्यतिरिक्त यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते. नाश्त्यासाठी हा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामुळे तुमचे वजनही कमी होते. 5. केळी केळी खाल्ल्याने लठ्ठपणा येत नाही. केळी तुमच्यासाठी परिपूर्ण वजन कमी करणारा आहार आहे. केळीला पॉवर हाऊस मानले जाते आणि ऊर्जेचा खूप चांगला स्त्रोत आहे. 6.ओट्स ओट्स फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, वजन व्यवस्थापनासाठी ओट्स हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर ओट्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकते. हे चयापचय वाढवते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर 7. इडली तुमच्या नाश्त्यात इडलीचा समावेश करा. यामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि निर्मिती प्रक्रियेमुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया निरोगी राहण्यासही मदत होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Weight, Weight loss tips

    पुढील बातम्या