मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाहेरुन पुरुष पण आतून महिला! 30 वर्षानंतर उघड झालं रहस्य, डॉक्टरांनी केली त्रासातून सुटका

बाहेरुन पुरुष पण आतून महिला! 30 वर्षानंतर उघड झालं रहस्य, डॉक्टरांनी केली त्रासातून सुटका

वयाच्या तिशीमध्ये असलेल्या एका तरुणाच्या शरीरात स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही प्रजनन अवयव होते.

वयाच्या तिशीमध्ये असलेल्या एका तरुणाच्या शरीरात स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही प्रजनन अवयव होते.

वयाच्या तिशीमध्ये असलेल्या एका तरुणाच्या शरीरात स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही प्रजनन अवयव होते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 26 फेब्रुवारी :  स्त्री आणि पुरुषांच्या शरीराची रचना वेगळी असते. दोघांच्या शरीरातल्या प्रजनन प्रणालीत असलेला वेगळेपणा हा सर्वांत मोठा फरक आहे. कधी-कधी मात्र निसर्गाच्या किमयेमुळे या अवयवांची अदलाबदल किंवा स्त्री-पुरुषाच्या शरीरामध्ये गुंतागुंत निर्माण होते. अशीच एक दुर्मीळ घटना समोर आली आहे. वयाच्या तिशीमध्ये असलेल्या  एका तरुणाच्या शरीरात स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही प्रजनन अवयव होते. त्याला Persistent Müllerian duct syndrome (पीएमडीएस) हा लैंगिक विकासाचा एक दुर्मीळ विकार होता.

    उत्तर प्रदेशमधील फरिदाबादमधल्या अमृता हॉस्पिटलमधल्या तज्ज्ञांच्या पथकाने त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातले स्त्री अवयव काढून टाकले आहेत. 'इंडिया टुडे'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    डॉ. मानव सूर्यवंशी यांच्यासह डॉ. रितेश गोयल आणि डॉ. गौतम खन्ना यांनी या तरुणावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यानं समाधान व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, "मी शस्त्रक्रियेच्या परिणामांमुळे खूप आनंदी आहे. आता मला सर्वसामान्य जीवन जगता येईल अशी अपेक्षा आहे. दुर्मीळ विकाराचं माझ्या मनावर मोठं ओझं होत. ही दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो."

    आश्चर्य! डिलीव्हरीच्या 6 महिन्यांनी महिला पुन्हा प्रेग्नंट आणि जन्माला आले MoMo Babies

    काय होते प्रकरण?

    पीएमडीएस या वैद्यकीय स्थितीत पुरुषाच्या शरीरात नर आणि मादी दोघांच्याही प्रजनन प्रणाली असतात. गर्भधारणेदरम्यान गोनॅडल (संप्रेरक तयार करणाऱ्या प्रजनन ग्रंथी) ग्रंथींच्या दोषपूर्ण विकासामुळे पीएमडीएस होतो. पीएमडीएस असलेल्या पुरुषांमध्ये गर्भाशय, फॅलोपियन ट्युब आणि काही वेळा अंडाशयही यांसारखे स्त्री प्रजनन प्रणालीतले अवयव विकसित होतात.

    फरिदाबादमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या या तरुणाचं लग्न होऊन पाच वर्षं झाली आहेत; मात्र पीएमडीएसमुळे तो पिता होऊ शकला नाही. त्यानं भारतातल्या अनेक रुग्णालयांना भेट देऊन एंडोक्रायनोलॉजिकल, आनुवंशिक आणि मानसशास्त्रीय प्रोफाइलसाठी तपासणी केली होती.

    Shocking Video : धबधब्यावर उलटी होऊन स्टंट करत होती तरुणी, तोल गेला अन्...

    फरिदाबादच्या अमृता हॉस्पिटलमधल्या यूरो-ऑन्कॉलॉजी आणि रोबोटिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मानव सूर्यवंशी म्हणाले, "या रुग्णाची तपासणी केल्यावर आम्हाला आढळलं, की त्याचे वृषण/अंडकोष अद्याप ओटीपोटातच आहेत."

    डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, एमआरआय स्कॅनमध्ये असं दिसून आलं की त्याच्या शरीरात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब सारखे स्त्री प्रजनन अवयवदेखील आहेत. रुग्णाला जन्मापासूनच पीएमडीएस आहे आणि त्याला त्याबद्दल माहितीच नव्हती. पीएमडीएस ही एक दुर्मिळ स्थिती आहे. जगाच्या वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत या प्रकारची 300हून कमी प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

    डॉ. मानव सूर्यवंशी यांनी सांगितलं, की हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं. कारण रुग्णाच्या शरीरातल्या अनेक अवयवांची गुंतगुंत झालेली होती. अशा शस्त्रक्रियांसाठी शरीरशास्त्रीय ज्ञानाची सखोल आवश्यकता असते. शस्त्रक्रियेदरम्यान मूत्रवाहिनीला नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. ते म्हणाले, "आमच्या नियोजनामुळे आणि रोबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीनं आम्ही रुग्णावर समाधानकारक उपचार करू शकलो. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कीहोल आकाराचा छेद घेऊन शस्त्रक्रिया करता येते."

    First published:
    top videos

      Tags: Health, Uttar pardesh