मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाटलीतील पाणी पिण्याआधी हे जरूर तपासा; नाहीतर अमृतासारखं पाणीही ठरेल 'विष'

बाटलीतील पाणी पिण्याआधी हे जरूर तपासा; नाहीतर अमृतासारखं पाणीही ठरेल 'विष'

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

आपण पाणी पितो ती प्लॅस्टिकची बाटलीही विषारी असू शकते. प्लॅस्टिकची बाटली विषारी आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटलीच्या खाली दिलेले नंबर्स व मार्कर्स समजून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 18 मार्च : उन्हाळा सुरू झाला की तहानही भरपूर लागते. घरातून बाटलीत भरून नेलेलं पाणीही पुरत नाही. अशावेळी आपण दुकानातून पाण्याची बाटली खरेदी करतो. या पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या असतात. पण प्लॅस्टिकची ही पाण्याची बाटली जर तुम्ही नीट तपासून घेतली नाही तर त्यातील अमृतासारखं पाणीही तुमच्यासाठी विष ठरू शकेल. कारण प्लॅस्टिकची बाटली विषारीही असू शकते. आता तुम्ही खरेदी केलेली प्लॅस्टिकची बाटली विषारी आहे की नाही, हे ओळखण्याचीही सोपी पद्धत आहे.

प्लॅस्टिकची बाटली वापरण्यायोग्य आहे की नाही, हे ती बाटली पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. प्लॅस्टिकच्या बाटलीच्या खाली दिलेले नंबर्स व मार्कर्स समजून घ्या. प्रत्येक बाटलीखाली एक नंबर लिहिलेला असतो आणि त्यावर मार्कर असतो. ही बाटली वापरण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, हे त्या मार्करवरून ठरवता येतं. तुम्ही स्वतःसाठी पाण्याची बाटली विकत घ्यायला जाल तेव्हा तिच्या खाली लिहिलेले अंक आणि मार्कर पाहा.

उन्हाळ्यात कलिंगड खाताय सावधान! आधी हा VIDEO जरूर पाहा

प्लॅस्टिक बाटलीवरील नंबर

एखाद्या बाटलीच्या तळाशी 2, 4 किंवा 5 नंबर लिहिलेले असतील तर ती खरेदी करा. या बाटल्या पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. केवळ हे नंबरच नाही, तर तळाशी लिहिलेले शब्द पाहून तुम्ही स्वतःसाठी प्लॅस्टिकची बाटली खरेदी करू शकता.

कोणत्याही बाटलीच्या तळाशी 1 किंवा 7 नंबर लिहिलेले असतील, तर तुम्ही तीही वापरू शकता. पण, या बाटल्यांचा वापर विचारपूर्वक करा, कारण या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. या प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर बेव्हरेज बाटल्या, अन्न साठवणारे जार, क्लॉथ फायबर आणि माउथवॉशच्या बाटल्यांसाठी केला जातो.

एखाद्या बाटलीच्या तळाशी 3 किंवा 6 नंबर लिहिलेला असेल तरी ती बाटली चुकूनही खरेदी करू नका. अशा बाटल्या सर्वात हानिकारक असतात. अशा प्लॅस्टिकचा वापर प्रामुख्याने पाईप्स, क्लिनर बाटल्या, स्वयंपाकाच्या तेलाच्या बाटल्या आणि शॉवर कर्टन्स बनवण्यासाठी केला जातो.

प्लॅस्टिक बाटलीवरील मार्क

तुम्हाला कोणत्याही प्लॅस्टिकच्या बाटलीखाली HDPE (High Density Polyethylene), LDPE (Low Density Polyethylene) आणि PP (Polypropylene) लिहिलेले दिसत असेल तर ती बाटली विकत घेऊ शकता. या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात.

तसंच बाटलीच्या तळाशी PET (Polyethylene Terephthalate) आणि PC (Plastic Others) लिहिलेलं असेल तरी त्यांचा वापर टाळा.

तसंच जर तुम्हाला कोणत्याही प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी PVC (Polyvinyl Chloride) आणि PS (Polystyrene) लिहिलेलं दिसत असेल तर चुकूनही त्याची खरेदी करू नका. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची 'ही' योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल

पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी स्टील किंवा तांब्याची बाटली वापरणं कधीही चांगलं असतं. अशा बाटल्या तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवत नाहीत आणि तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

First published:

Tags: Health, Lifestyle, Summer, Water