मुंबई, 24 मार्च : आपले केस मुलायम, दाट असावेत असं प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटतं; पण बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, प्रदूषण, विविध आजारांमुळे महिला आणि पुरुषांमध्ये अकाली केस गळणं, केस पातळ होणं किंवा टक्कल पडण्याची समस्या वाढताना दिसत आहे. या समस्येमुळे लूक आणि पर्सनॅलिटीवरही परिणाम होत आहे. अनेक पुरुषांना केस गळतीमुळे कमी वयातच टक्कल पडल्याचं दिसून येत आहे. पुरुषांमध्ये अकाली केस गळण्याची, टक्कल पडण्याची समस्या थोपवण्यासाठी सातत्याने संशोधन होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने तैवानमध्ये एक संशोधन करण्यात आलं. हे संशोधन नेमकं काय होतं, त्यातून काय निष्कर्ष समोर आले ते सविस्तर जाणून घेऊ या.
केस गळती, केस पातळ होणं आणि अकाली टक्कल पडणं या गोष्टी महिलांसोबत पुरुषांसाठीही चिंतेचा विषय आहेत. अलीकडच्या काळात पुरुषांमध्ये केसांशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. यामागे काही कारणं आहेत. संशोधक या समस्येवर सातत्यानं संशोधन करत आहेत. पुरुषांमधल्या केसगळतीच्या समस्येला एंड्रोजेनिक अॅलोपेसिया अर्थात मेल पॅटर्न बाल्डनेस असं म्हणतात. यात केसांच्या ग्रंथी हळूहळू मृत होऊ लागतात. त्यामुळे नवीन केस उगवत नाहीत. केसांच्या मुळाशी रक्तवाहिन्या नसल्याने हे घडतं.
हॉस्पिटलऐवजी घरीच केली डिलीव्हरी; जन्माला आलं असं बाळ जे आजवर कधीच पाहिलं नाही
केस सातत्याने गळत असतील आणि टक्कल पडायला सुरुवात झाली असेल तर हे पॅटर्न बाल्डनेसचे संकेत आहेत. डिफ्यूज थिनिंग अर्थात केस पातळ होणं हेदेखील पॅटर्न बाल्डनेसचं लक्षण असू शकतं. डोक्याच्या पुढच्या भागावरचे केस पातळ होत असल्यास ते देखील मेल पॅटर्न बाल्डनेसचं लक्षण मानलं जातं. या समस्या दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. यावर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. वेळेवर उपचार केले तर ही समस्या वेळीच रोखली जाते.
तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण तैवानमध्ये पुरुषांमधल्या केसांच्या समस्येवर नुकतेच संशोधन करण्यात आले. त्यात ज्या पुरुषांची तर्जनी अर्थात इंडेक्स फिंगर अनामिकेपेक्षा लहान असतं, अशा पुरुषांना टक्कल पडण्याची शक्यता सहा टक्के जास्त असते, असं दिसून आलं. उजव्या हाताच्या अनामिकेच्या अतिरिक्त लांबीचा संबंध टक्कल पडण्याशी असल्याचं संशोधकांना दिसून आलं. या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी 37 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 240 पुरुषांच्या हाताचे विश्लेषण केलं. या पुरुषांमध्ये अँड्रोजेनिक अॅलोपेसिया अर्थात मेल पॅटर्न बाल्डनेस असल्याचं दिसून आलं. जेव्हा सेक्स हॉर्मोन डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं उत्पादन जास्त होतं, तेव्हा पॅटर्न बाल्डनेसची समस्या उद्भवते. यामुळे केसांच्या वाढीच्या चक्रावर परिणाम होतो. बोटांची जास्त लांबी हे टेस्टोस्टेरॉन जास्त असण्याचं लक्षण असू शकतं. यामुळे केसांच्या ग्रंथी संकुचित होतात, असं तैवानमधल्या संशोधकांचं म्हणणं आहे.
Diabetes रुग्णांनी गोड गोड Watermelon खाल्लं तर काय होईल? हा VIDEO पाहिला नाही तर पस्तावाल
आज तकच्या वृत्तानुसार तैवानमधल्या काऊ शुंग युनिव्हर्सिटीतले प्रमुख संशोधक डॉ. चिंग यिंग वू यांनी सांगितलं, की `आमच्या अभ्यासात असं दिसून आलं की उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची उंची चौथ्या बोटापेक्षा जितकी कमी असेल तितका टक्कल पडण्याचा धोका जास्त असतो.`
अनामिकेची जास्त लांबी पुरुषांमध्ये उच्च टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. या सेक्स हॉर्मोनच्या जास्त प्रमाणाचा संबंध हृदयविकार, शुक्राणूंची संख्या कमी होणं आणि पुरुषांमध्ये ऑटिझम, तसंच टक्कल पडणं या समस्यांशी आहे, असं संशोधकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.