ज्येष्ठांसाठी घरात बदल करताना 'ही' काळजी तुम्ही घ्यायलाच हवी

घरात ज्या-ज्या भागात ज्येष्ठांचा वावर आहे, त्या भागातलं फर्निचर, स्टोअरेज, दारं-खिडक्या आणि प्रकाश व्यवस्था 'अशी' ठेवा

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 07:15 PM IST

ज्येष्ठांसाठी घरात बदल करताना 'ही' काळजी तुम्ही घ्यायलाच हवी

मुंबई, 20 जून : ज्येष्ठ सदस्यांसीठी जर तुम्ही घरात काही बदल करणार असाल तर सुरक्षिततेच्या दृ्ष्टीकोनातून तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. घरात ज्या-ज्या भागात त्यांच्या वावर आहे त्या भागातलं फर्निचर, स्टोअरेज, दारं-खिडक्या, प्रकाश व्यवस्था या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं. ज्येष्ठांसाठी घरात बदल करताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 - घरातलं स्टोअरेज म्हणजेच शेल्फ हे खूप जास्त उंचीवर ठेवू नका. बरेचदा वृद्धांना सांधेदुखीचा त्रास असतो. अशावेळी त्यांना उंचावर ठेवलेल्या वस्तू काढणं शक्य होत नाही. छोटा स्टूल घेऊन त्यावर चढल्यास पडण्याची जास्त भीती असते. तसंच त्यांना नेहमी लागणाऱ्या वस्तू या त्याना लगेच घेता येतील अशा ठिकाणी ठेवाव्या.

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' 8 घरगुती उपाय

2 - अनेक ज्येष्ठांना वॉकर घेऊन चालावं लागतं. इतर कोणत्याही जागेपेक्षा घरातल्या दरवाजांमधून त्यांना वॉकर घेऊन सहज वावरता येईल याची काळजी घ्यावी. त्यासाठी दरवाजांमधील जागा ही पुरेशी मोकळी असावी. तसंच दरवाज्यातील की-होल म्हणजे ज्यातून बाहेर पाहिलं जातं ते ज्येष्ठ व्यक्तींच्या उंचीइतकं ठेवावं.

3 - घरातील नळांचे पाइप हाताजवळ येतील, असे करून घ्यावेत. म्हणजेच वृद्ध व्यक्तींना बंद किंवा सुरू करण्यासाठी वाकावं लागणार नाही.

Loading...

4 - घरातले सगळे दरवाजे आणि खिडक्यांची तावदानं ही सहजरित्या उघडता किंवा बंद करता येतील अशी असावीत. नेहमी वंगण किंवा तेल टाकून त्यांची बिजागिरे सैल करावी. ज्यामुळे त्यांची उघडझाप करणं ज्येष्ठांना सोपं जाईल.

5 - बाथरूम किंवा टॉयलेटमधील टाइल्स या अॅन्टीस्किप म्हणजेच घसरणीला विरोध करणाऱ्या असाव्यात. शक्यतो ज्यावरू घसरण्याची जास्त शक्यता असते अशा मॅट आणि व्हिट्रीफाइड टाइल्स नसाव्यात.

6 - ज्या ठिकाणी वृद्धांना आधाराची गरज असते अशा जागांवर ग्रॅब बार म्हणजे स्टीलच्या आडव्या दांड्या लावून घ्याव्या. बाथरूम, जीने आदि ठिकाणी चालताना वृद्धांना आधाराची गरज लागते अशा ठिकाणी त्यांना आधारासाठी हे स्टीलचे रॉड मदतीला येतील.

पावसाळ्यात होणाऱ्या 'या' 5 आजारांची अशी घ्या काळजी

7 - वृद्ध माणसांसाठी असलेले बेड हे नेहमी उंच असावेत. जेणेकरून त्यांना खूप खाली बसण्याची गरज भासणार नाही. बेड, खुर्च्यांमधील गादी आणि कुशन्स हे जास्त खोल जाणारं नसावं. त्यांना सहज उठता-बसता येतील असं ते असावं.

8 - घरातली प्रकाश व्यवस्था ही खूप जास्त भडक आणि डोळ्यांना दिपवणारी नसावी. कारण साठीनंतरच्या वयात अनेकांची दृष्टी मंदावते. यामुळे डोळ्यांपुढे अंधारी येऊन त्यांचा तोल जाण्यासाची जास्त शक्यता असते. त्यामुळे घरातली प्रकाश व्यवस्था ही नेटकी असावी.

9 - जमिनीवर गालिचे किंवा रग अंथरलेले असल्यास त्यांच्या कडा व्यवस्थित असाव्यात आणि त्यांचे दोरे बाहेर आलेले नसावे. कारण त्यात अडकून पडण्याची जास्त शक्यता असते.

10 - कपडे वाळत घालण्यासाठी ज्येष्ठांसाठी विशेष व्यवस्था असायला हवी.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...