शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके

शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके

शिफ्ट जॉब करणाऱ्यांच्या आरोग्यावर दोन प्रकारे नकारात्मक परिणाम होतो

  • Share this:

मुंबई, 15 जून  : शहरात अनेक लोकं शिफ्टमध्ये काम करतात. कधी दिवसाची तर कधी रात्रीची. यामुळे त्यांच्या शरीराची लय बिघडते. आरोग्याबाबत अनेक प्रकारच्या समस्या वाढतात. शिफ्ट जॉब करणाऱ्यांच्या आरोग्यावर दोन प्रकारे नकारात्मक परिणाम होतो. एक म्हणजे जीवनशैलीत बदल आणि दुसरं म्हणजे शारीरिक बदल. नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना तर निसर्ग नियमांविरुद्ध कायम झगडावं लागतं.

नोकरीसाठी पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला जाताय? मग 'या' 5 टिप्स एकदा वाचा

सगळ्या आजारांचं केंद्र म्हणजे आपलं पोट. आरोग्या चांगलं ठेवायचं असेल तर पचन यंत्रणा ही उत्तम असायला हवी. पचन तंत्रातील गडबडीचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर पडतो. जी व्यक्ती रोटेटिंग शिफ्ट किंवा नाइट शिफ्टमध्ये काम करते किंवा जॉ़ब निमित्त ज्या व्यक्तीला सतत प्रवास करावा लागतो अशी व्यक्ती आहाराबाबत अत्यंत निष्काळजी झालेली असेत. शरीराला पोषक अन्न मिळत नसल्यामुळे आणि खाण्याच्या वेळाही निश्चित नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या पचनशक्तीवर होतो. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या झोपेवरही होतात.

रोटेटिंग शिफ्ट, नाइट शिफ्ट, टुरिंग जॉब करणाऱ्या बहुतांश लोकांची झोप पूर्ण होत नाही. झोपण्याची वेळ आणि तास निश्चित नसणे, माहित नसलेल्या ठिकाणी झोपणे, स्लीप शेड्यूल गडबडणे अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. सतत झोपेच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. अनिद्रेमुळे नैराश्य, एंग्जाइटी यांसारखे मानसिक

रिझल्ट ओरिएन्टेड काम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत 'या' 7 गोष्टी

आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. रोग प्रतिकारक क्षमताही कमी होते. ज्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.

जे लोकं निश्चित शिफ्टमध्ये काम करत नाहीत, त्यांना वेळेशी जुळवून घेताना कामाचा ताणही सहन करावा लागतो. यामुळे ते सतत तणावाखाली असतात. जेव्हा त्यांना झोपायचं असतं, तेव्हा त्यांना जागावं लागतं. यामुळे त्यांचं जैविक घड्याळ बिघडतं. योग्य काम करण्यासाठी त्यांच्या मेंदूवर सतत दबाव असतो. यामुळे डोकेदुखीची समस्या मागे लागते.

First published: June 15, 2019, 6:09 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या