आरामदायी झोपेसाठी जाणून घ्या नेमकी कोणती पद्धत आहे योग्य?

चांगली झोप घेणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर उत्तम शरीरासाठीसु्द्धा आवश्यक असतं

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 10:11 PM IST

आरामदायी झोपेसाठी जाणून घ्या नेमकी कोणती पद्धत आहे योग्य?

मुंबई, 21 जून : चांगली झोप घेणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर उत्तम शरीरासाठीसु्द्धा आवश्यक असतं. चांगली झोप घेतल्याने शरीर आणि मन ताजतवानं राहतं, आपण दिवसभर उत्साहाने काम करू शकतो. तर झोप चांगली लागावी यासाठी झोपण्याच्या योग्य पद्धती (पोश्चर) कोणत्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चांगली झोप घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज पडते. झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर तुमची झोप अपूर्ण राहते. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना जाणवतात. या वेदना जर दीर्घकाळ होत राहिल्या तर शरीरातल्या पेशी, रक्तवाहिन्या आणि हाडं ठिसूळ बनतात.

झोपण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणी कुशीवर, कुणी पाठीवर तर कुणी पोटावर झोपतं. कुणाला डोक्याखाली उशी हवी असते, तर कुणी हातालाच उशी बनवून त्यावर डोकं टेकवतात.

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

कुशीवर झोपणं - कुशीवर झोपण्याचे फायदे लक्षात घेवून अनेकजण डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्यास प्राधान्य देतात. डॉक्टरसुद्धा रुग्णांना उजव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला देतात. उजव्या कुशीवर झोपल्याने शरीरातला आम्लीय संचार सुरळीत राहतो. पचनक्रियाही सुरळीत राहते आणि रक्ताभीसरण क्रियासुद्धा वेगाने होते. या सगळ्या गोष्टी शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेकजण उजव्या कुशीवर झोपतात. मात्र या पद्धतीने झोपल्यास पोट आणि फुप्पुसांवर अनावश्यक दबाव पडतो. मानेवरसुद्धा ताण येतो.

Loading...

तुम्हाला शांत झोप लागत नाही? तर मग हे नक्की वाचा

पाठीवर झोपणं - पाठीवर झोपताना डोळे छताकडे असतात. या स्थितीत झोपताना अनेकजण डोक्याखाली उशी घेतात. तर अनेकजण उशी न घेता झोपतात. या स्थितीत झोपल्यास श्वासोश्वास उत्तम प्रकारे सुरू राहतो. पाठ सरळ असते. त्यामुळे झोपेत पाठ आखडण्याची शक्यता राहत नाही. मात्र, या स्थितीत झोपणाऱ्या लोकांना घोरण्याचा त्रास अधिक असतो.

पोटावर झोपणं - ज्यांना घोरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी झोपण्याची ही योग्य पद्धत आहे. पण मणक्याच्या हाडासाठी हे नुकसानकारक ठरतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 21, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...