मुंबई, 12 जून - आयुर्वेदानुसार प्रत्येकाची प्रकृती ही वात, कफ आणि पित्त या तीनपैकी एक प्रकारची असते. तुम्हाला तुमची प्रकृती कशी आहे हे माहित आहे का? ती कशी आहे हे एकदा समजल की दिवसभरात आहार कसा घ्यायाच याचं नियोजन तुम्हाला करताय येतं. यामुळे कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास न होता तुमचा दिवस उत्तम जातो. जर तुमची प्रकृती वात प्रकारची असेल तर काय करायला हवं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्यायाम न करता फिट राहायचं असेल, तर परफेक्ट आहे 'हा' उपाय
वात प्रकृतीच्या लोकांनी जास्त परिश्रमाची कामे करू नेयत. तसंच जास्त व्यायाम होईल अशी कोणतीही व्यायाम पद्धती आचरणात आणू नये. त्याचा त्यांना लगेच थकवा येतो आणि शरीर आणखी कृश बनण्याचा धोका असतो. वात प्रकृतीच्या लोकांना जास्त थकवा येतो. पटकन दम लागत असल्यामुळे त्यांनी थोडा थोडा व्यायाम करावा.
जेवणात शक्यतो आंबट, गोड आणि स्निग्ध पदार्थ इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त असावेत. साजूक तूप असणारे पदार्थ अशा व्यक्तिंनी जास्त प्रमाणात खावे. मुळात वात प्रकृतीच्या लोकांनी थंड वातावरणात अधिक काळ राहू नये. पंख्याचा वारा, वातानुकूलित यंत्रणा यांच्या सानिध्यात जास्त वेळ राहल्यास त्यांना सतत सर्दी होते. तसेच हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतो.
उत्तम शरीरयष्टी कमवायची असेल तर 'हा' संतुलित आहार तुम्ही घ्यायलाच हवा
वात प्रकृतीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत चंचल असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यात नेहमी विषमता दिसून असते. एखादा निर्णय घेण्यास अनेकदा खूप उशीर लावतात, तर कधी लगेच निर्णय घेऊन मोकळे होतात. शरीर कृश, सडसडीत असल्यामुळे त्यांची भूक ही विषम असते. त्वचा कोरडी असते. झोप खंडीत राहत असल्यामुळे अशा लोकांनी झोपेसाठी शांत ठिकाण निवडावं.