सावधान! सॅनिटायझरचा अतिवापर केल्यानं होऊ शकतात ‘हे’ आजार

सावधान! सॅनिटायझरचा अतिवापर केल्यानं होऊ शकतात ‘हे’ आजार

सध्या धावपळीच्या जीवनात आपण हात धुण्यासाठी हमखास सॅनिटायझरचा पर्याय निवडतो. स्वाईन फ्लू किंवा इतर विषाणूजन्य आजारांना लांब ठेवण्यासाठी हल्ली ऑफिसमध्येही सॅनिटायझर ठेवले जातात. पण ते वापरण्याआधी हे वाचा...

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : स्वच्छ राहणं आणि हात धुवून मगच जेवायला बसणं एक चांगली सवय आहे. यामुळे तुम्ही स्वच्छ तर राहताच पण सोबतच तुमच्या शरीरात किटाणूंचा शिरकावही होत नाही. मात्र सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कामात खूप बीझी असतो. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं. अनेकदा आपण आपल्या कामाच्या ठिकामीच जेवण करतो. त्यामुळे हात धुवायला वेळ मिळत नाही. अशावेळी आपण सॅनिटायझरचा पर्याय निवडतो. यामुळे आपल्या त्वचेवरील कीटाणू नष्ट होतात. पण सॅनेटायझरचा अतिवापर तुमच्या तुमच्या आरोग्यासाठी तितकंच धोकादायक ठरू शकतं.

हँडवॉशला पर्याय म्हणून सॅनिटायझर वापरणं एका ठराविक मर्यादेपर्यंत योग्य आहे. मात्र जर तुम्हाला सतत सॅनिटायझर वापरायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण सॅनिटायझरचा अति वापर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रणं देतो. याच्या अतिवापरानं तुम्हाला त्वचेचे रोग होऊ शकतात. जसे की त्वचेवर चट्टे उठणे, जळजळ होणे तसेच यामुळे तुमच्या स्नायूमध्येही समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घेऊया सॅनेटायझरचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम...

थर्माकॉलच्या कपात चहा पिताय; मग होऊ शकतो ‘हा’ आजा

1. सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लोसन आणि बेन्जाल्कोनियम क्लोराइड नावाचे केमिकल्स असतात. जे तुम्ही सॅनिटायझार लावल्यावर तुमच्या त्वचेत शोषले जातात आणि नंतर ते त्वचेमार्फत रक्ताच्या संपर्कात येतात. त्यामुळे तुमच्या स्नायूनवर त्याचा परिणाम होतो. तसेच त्वचेची जळजळ आणि त्वचेला खाज येणं सुरू होतं.

2. सॅनिटायझरमध्ये फॅथलेट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे त्याला हलकासा सुगंध येतो. मात्र हे केमिकल लिवर, किडनी आणि फुफ्फुसांसाठी नुकसानकरक असतं. हे माणसाच्या प्रजनन क्षमतेवरही नकारात्मक परिणाम करतं.

वजन कमी करण्यासोबत बडीशेप खाण्याचे आहेत अनेक 'हे' 5 फायदे

ऑफिसमध्ये सररास लपवली जाते 'ही' खास गोष्ट- सर्व्हे

3. सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर प्लास्टिकची बॉटल, डब्बा यांना स्पर्श केल्यास तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात. प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये ‘बिस्फेनोल-ए’ नावाचं रसायन वापरलं जातं. ज्यामुळे व्यक्तीला कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे सॅनेटायझरचा अतिवापर केल्यानं तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

================================================================

VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

First published: July 12, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading