S M L

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात. मात्र अनेकांची पूर्ण रात्र कड बदलण्यात जाते.

Updated On: May 19, 2019 10:00 AM IST

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

मुंबई, 16 मे : दिवसभर काम करुन, रात्री वेळेवर झोपायला कोणाला आवडणार नाही? धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकजणांना शांत झोप लागत नाही. दिवसभराचा थकवा दूर घालविण्यासाठी किमान 8 तास तरी रात्रीची झोप आवश्यक असते. मात्र, झोप पूर्ण होत नसल्यामुळे अनेकांना डोकं दुखी आणि दिवसभार मानसिक थकवा जाणवतो. असं सातत्याने सुरू राहिलं तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि कालांतराने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात. मात्र अनेकांची पूर्ण रात्र कड बदलण्यात जाते. रोगप्रतिकारक शक्ती जर उत्तम ठेवायची असले तर रात्रीची शांत झोप आवश्यक आहे.


फोन आणि लॅपटॉपचा वापर - अलिकडे फोन आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढला आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास डोळे लाल होतात आणि सातत्याने डोळ्यातून पाणी येतं. डोळयांना सूज येते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळ आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. डोळ्यांच्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर ही तुमच्या अपुऱ्या झोपेचे कारणं असू शकतं.रागाचा पारा नियंत्रणात ठेवायचा असले तर हे कराच तुम्ही


Loading...

चहा किंवा कॉफी प्रमाण - दिवसभरात चहा आणि कॉफी जास्त घेतल्याने झोपेचं वेळपत्रक बिघडतं. पुरेशी झोप न झाल्यामुळे अनेकजण जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतात. यांच्या अतिसेवनाने सुद्धा अनेकांच्या झोपेचं रुटीन बदलू शकतं.


जंक फूड खाण्याची सवय - अलिकडे झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. जंक फूड खाण्यामुळे पुरेशा पोषक तत्त्वचा मेंदूला पुरवठा होत नाही. शांत झोपायचं असेल तर सतत जंक फूड खाणं टाळावं.


वजन कमी करण्यासाठी खा तूप; आरोग्य होईल सुदृढ


वेळी-अवेळी झोप - अनेकांची झोपेचं वेळापत्रकच नसतं. वेळी अवेळी झोपल्यामुळे शांत झोप लागत नाही आणि पूर्णही होत नाही. दररोज ठराविक वेळेला झोप आणि शरीरासाठी व्यायाम ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.


सतचा ताणतणाव - एखादी व्यक्तीवर जर सतत ताण तणावात असेल तर त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. त्याचा स्वभाव रागीट होतो. रात्रीची कमी झोप पूर्ण झाली नाही तर ही लक्षणं त्याच्या स्वभावात दिसून येतात. सततचा ताण दूर करण्यासाठी नियमित ध्यान-योग करायला हवं. रात्री शतपावली आणि पहाटे उठून फिरयला जाण्यानेसुद्धा फरक पडतो.

VIDEO : बाळांकडे लक्ष द्या! दीड वर्षाच्या चिमुरड्याचा चटका लावणारा मृत्यू


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2019 06:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close