चेहऱ्यावरची लव घालवायची असेल तर करा 'हे' 5 सोपे उपाय

चेहऱ्यावरची लव घालवायची असेल तर करा 'हे' 5 सोपे उपाय

चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे सौदर्य फिकं पडतं आणि आत्मविश्वासही कमी होतो

  • Share this:

मुबई, 12 जून : चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे सौदर्य फिकं पडतं आणि आत्मविश्वासही कमी होतो. नको असेली ही लव घालवायची म्हटली तर अनेक समस्या उद्भवतात. त्यसाठी आज आम्ही तुम्हाला काही साधे आणि सोपे उपाय सांगणार आहोत.

1 - हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करावी. चेहऱ्यावर ज्याठिकाणी ही लव  आहे त्याठिकाणी ही पेस्ट लावावी. जरा वेळाने ती वाळल्यानंतर गरम पाण्यात एक स्वच्छ कापड भिजवून चेहरा स्वच्छ पुसावा. हळद ही जंतूनाशक आणि तेजवर्धक असल्याने चेहऱ्यावरी लव काढण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

ब्लॅकहेड्स काढताना करू नका 'या' चूका, अन्यथा पडेल महागात

2 - चेहऱ्यावरील लव काढण्यासाठी पूर्वीपासूनच बेसन आणि हळदीचा वापर केला जातो. अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी एक टीस्पून बेसनात चिमूटभर हळद टाकावी. त्यात एक टीस्पून दही घालून मिश्रण एकजीव करावं. त्यानंतर चेहऱ्यावर ज्याठिकाणी लव आहे त्या ठिकाणी हा पॅक लावून हलक्या हाताने मसाज करावा. लावलेला पॅक मसाज करताना घर्षणामुळे वाळल्यानंतर कोंबट पाण्याने धुऊन टाका.

3 - चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी संत्र्याची साल आणि दह्याची पेस्ट फायदेशीर ठरते. संत्र्याच्या सालात दही आणि थोडासा लिंबाचा रस घालून हे मिश्रण तराय करावं. या मिश्रणाच्या उपयोगाने चेहऱ्यवर दिसणारी लव विरळ होत जाते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो.

मुरुम घालविण्यासाठी परिणामकारक आहेत 'ही' योगासनं

4 - चेहऱ्यावरील लव काढण्यासाठी साखर आणि लिंबाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. लिंबातील्या सौम्य ब्लिचिंग क्षमतेमुळे केसांची वाढ होत नाही. 30 ग्रॅम साखरेत 10 मिलीग्रॅम लिंबाचा ताजा रस आणि 150 मिली पाणि मिसळा. हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर वाढलेल्या अनावश्यक केसांवर लावा. 15 मिनीटे हे मिश्रण तसंच राहू द्या. त्यानतंर थंड पाण्याने धुऊन हलक्या हाताने मसाज करावा. साखा आणि लिंबाचा हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावावा.

5 - नॅचरल ब्लीच म्हणून पपईचा वापर केला जातो. पपईमुळे फक्त चेहऱ्याचाच रंग उजळत नाही तर चेहऱ्यावरील अनावश्यक केसांचाही रंग फिका होतो. हळद आणि पपईचा गर याचं मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावताना हलक्या हाताने मसाजसुद्धा करावी. त्यानंतर अर्धा तासाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. याचा पिरणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल.

First published: June 12, 2019, 3:38 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading