पावसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर 'या' 7 गोष्टी तुम्ही करायलाच हव्या

पावसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर 'या' 7 गोष्टी तुम्ही करायलाच हव्या

भौतिक स्वच्छते प्रमाणेच वैयक्तिक स्वच्छतेलासुद्धा तुम्ही तितकंच महत्त्व द्यायला हवं

  • Share this:

मुंबई, 20 जून : पावसाळ्यात आरोग्य निरोगी आणि उत्तम ठेवायचं असेल तर भौतिक स्वच्छते प्रमाणेच वैयक्तिक स्वच्छतेलासुद्धा तितकंच महत्त्व तुम्ही द्यायला हवं. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेशी निगडीत आहेत. त्या तुम्ही आचरणात आणल्या तर पावसाळ्यातसुद्धा तुमचं आरोग्य उत्तम राहील.

1 - अनेकजण पाठ धुवत नाहीत. अंघोळीच्या वेळी पाठीवर पाणी पडतं तेवढीच स्वच्छता असते. पाठ दिसत नाही म्हणून किंवा हात पोहोच नाही म्हणून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं.

पावसाळ्यात होणाऱ्या 'या' 5 आजारांची अशी घ्या काळजी

2 - हाताच्या बोटांनी किंवा सुती कपड्याचा वापर करून कान स्वच्छ करा. साचलेला मळ वेळोवेळी काढल्याने कान स्वच्छ राहतात.

3 -  हातांची आणि पायांची नखं नियमितपणे कापा. बहुतेकवेळा अंघोळ करताना नखांमधला मळ निघून जातो. जर तो निघाला नसेल तर छोटा ब्रश किंवा नेलकटरच्या सहाय्याने तो काढून टाका.

4 - दररोज दोन वेळा म्हणजे एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा रात्री दात स्वच्छ घासा. रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने दातात अडकलेले अन्नकण निघून जाताता. तसंच श्वासाला दुर्गंधी येत नाही.

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' 8 घरगुती उपाय

5 - उन्हाळ्यात घराबाहेर पडताना गॉगलचा वापर करावा.

6 - शरीराला अनुकूल आणि पोषक असं सकस अन्न नियमित सेवन करावं.

7 - शारीरिक स्वच्छते प्रमाणेच व्यायासुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो. तो नियमित करायलाच हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 20, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या