नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : डॉक्टर किंवा घरातली मोठी माणसंसुद्धा हिरव्या भाज्या
(Green Vegetable) खाण्याचा सल्ला जरूर देतात. पण, इतर पदार्थांप्रमाणे भाज्यांमध्येही भेसळ
(Adulterated in Vegetables) केली जाते. त्यामुळे आरोग्याला फायदा
(Health Benefits) होण्यासाठी खाणाऱ्या भाज्या हानिकारक
(Harmful) ठरतात. भाज्या ताज्या टवटवीत
(Fresh)हिरव्या दिसण्यासाठी त्यावर मॅलाकाइट ग्रीन नावाचं केमिकल
(Malachite Green Chemical) वापरलं जातं. ज्यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता असते. या केमिकलमुळे कॅन्सर
(Cancer) सारखा आजार होण्याचीही भीती असते.
पण, भाज्यांवर फवारलेलं हे केमिकल ओळखायचं कसं हाच खरा प्रश्न असतो. याचाच विचार करुन FSSAI
(Food Safety and Standards Authority of India) म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने आपल्या ट्विटर
(Twitter) हॅन्डलवर या संदर्भातला एक व्हीडिओ
(Video) शेअर केला आहे.
भाज्यांमध्ये असलेल्या मॅलाकाइट ग्रीन केमिकलला कसं ओळखाचं हे या व्हीडिओत सांगितलं आहे.
(
Microwave मध्ये पदार्थ गरम करतात? मग ही बातमी वाचाच आणि जाणून घ्या दुष्परिणाम)
मॅलाकाइट ग्रीन केमिकल
मॅलाकाइट ग्रीन नावाचं केमिकल भाज्या हिरव्या, ताज्या आणि टवटवीत ठेवण्यासाठी वापरलं जातं. भाज्या फ्रेश दिसण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी भाज्यांना मॅलाकाइट ग्रीनच्या मिश्रणात बुडवून काढलं जातं. हे रसायन अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीप्रोटोजोअल औषध म्हणून परजीवींना मारण्यासाठी वापरलं जातं. हे एक कार्सिनोजेनिक केमिकल आहे जे कर्करोगास कारणीभूत पेशींना वाढण्यात मदत करतं.
मॅलाकाइट ग्रीन केमिकल कंस ओळखायचं
भाजीपाल्यावरील मॅलाकाइट ग्रीन केमिकल ओळखण्यासाठी एक कापसाचा गोळा घ्या आणि लिक्विड पॅराफिनमध्ये भिजवा. नंतर हा कापूस भाज्यांच्या पृष्ठभागावर थोडावेळ घासा. या कापसाच्या रंगात काही बदल झाला नाही तर भाज्यांवर हे केमिकल नाही असं समजा.
(
कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही? हे पदार्थ तब्येत वाढवतील फटाफट)
पण, जर कापसाचा रंग हिरवा होऊ लागला तर, यावर मॅलाकाइट ग्रीन वापरलं गेलं आहे असं समजावं. त्यामुळे अशा भाज्या खाल्ल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.