मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इम्युनिटी वाढवण्यासाठी खा हा मासा, हेल्दी हार्टसह होतील अनेक फायदे

इम्युनिटी वाढवण्यासाठी खा हा मासा, हेल्दी हार्टसह होतील अनेक फायदे

डोळे चांगले ठेवण्यासाठी टुना मासा खायला हवा.

डोळे चांगले ठेवण्यासाठी टुना मासा खायला हवा.

व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) पासून वाचण्यासाठी इम्युनिटी (Immunity) चांगली असणं महत्त्वाचं आहे. टूना मासा खाण्याने इम्युनिटी स्ट्राँग (Immunity Strong) होते.

    नवी दिल्ली, 6 जून : मांसाहारी लोक प्रोटीनसाठी (Protein) चिकन, मटण आणि अंडी खातात. चिकन, मटण आणि अंडी यामुळे आजारांशी लढण्याची ताकद (Strength to Fight Diseases) मिळते. मासेसुद्धा प्रोटीनचा मोठा सोर्स (Rich Sours of Protein)आहेत. मासे खाण्यामुळे स्मरणशक्ती ही (Memory) वाढते. काही आजारांमध्ये डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देतात. मासे खाण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक माशाची चव वेगळी असते. तसंच त्यातून मिळणारे पोषक घटकही वेगळे असतात. जाणून घेऊयात टुना फिश (Tuna Fish) म्हणजेच कुपा मासा खाण्याने होणारे फायदे. टुना मासा - टुना मासा एक विशेष प्रकारचा मासा आहे, ज्याला कुपा मासा देखील म्हटलं जातं. इतर माशांपेक्षा याचा आकार वेगळा असतो. समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारा हा मासा चवीला तर चांगला असतो, शिवाय शरीराला देखील लाभदायक आहे. या माशाने अनेक आजार दूर पळतात. (अभिनेत्री खासदार नुसरत जहाँ 6 महिन्यांची गर्भवती? पतीशी घटस्फोटच्या देखील चर्चा) टुना मासा खाण्याचे फायदे वजन कमी होतं - वजन कमी करायचं असेल, तर टुना म्हणजेच कुपा मासा खावा. या माशाचं ऑईल देखील वजन कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे कंबर दुखीच्या त्रासामध्ये आराम मिळतो. शिवाय यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते. मजबूत हाडांसाठी - हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी टुना माशांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं मजबूत करायची असतील, तर टुना मासा नेहमी खावा. संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी इम्युनिटी स्ट्रॉंग असायला हवी. त्याने इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळेच टुना मासा खाण्याने फायदा मिळू शकतो. टुना माशामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे इम्युन सिस्टिम मजबूत होते. (या अभिनेत्याकडे आहे 18 कोटींची व्हॅनिटी व्हॅन; पाहा आलिशान गाडीचे Inside Photos) डोळ्यांसाठी फायदेशीर हाडांबरोबर शरीराचे इतर अवयव देखील निरोगी असणं आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी टुना मासा खायला हवा. यामुळे नजर चांगली होते. निरोगी हृदयासाठी  टुना मासा खाल्ल्यामुळे हृदयालाही फायदा होतो. टुना माशामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे हृदय रोगाची भीती कमी होते. मासांहारी लोकांनी आहारात नियमित टुना माशाचा समावेश करावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fish, Food, Tasty food

    पुढील बातम्या