Home /News /lifestyle /

स्लिम ट्रिम होण्यासाठी झोपण्याआधी फॉलो करा ‘या’ Tips; रात्रीतून होईल वजन कमी

स्लिम ट्रिम होण्यासाठी झोपण्याआधी फॉलो करा ‘या’ Tips; रात्रीतून होईल वजन कमी

वजन नियंत्रणात राहण्यासाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे.

वजन नियंत्रणात राहण्यासाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे.

रात्री झोपताना होणाऱ्या चुका आपल्या वजन कमी (Weigh Loss) करण्याच्या स्वप्नाला सुरूंग लावतात. तुमच्याकडून ही या चुका होत असतील तर,त्या टाळण्याचा मार्ग पहा.

    दिल्ली, 21 जुलै :  वजन वाढल्यावर (Weigh Gain) आपलं टेन्शनही वाढतं. कितीही प्रयत्न केले तरीही वजन वाढत असेल. तर, रात्रीच्या वेळी काही चुका (Mistake) आपण करत नाहीना हे पाहा. स्लिम ट्रिम (Slim trim) होण्याचं स्वप्न पाहत असाल आणि त्याकरता वेळ देणं शक्य नसेल. नोकरीमुळे आणि रोजच्या धावपळीमुळे डायट प्लॅन (Diet Plan) फॉलो करणं शक्य नसेल तर, झोपण्याआधी काही टिप्स (Tips) वापरुन तुम्ही आपलं वजन कमी करू शकता. सातच्या आत जेवण रात्री सातनंतर खाणं-पिणं बंद करा. सूर्यास्तानंतर आपण जे खातो त्याची एनर्जी बनण्याऐवजी फॅट बनवतं म्हणूनच सकाळी भरपूर नाष्टा करावा, दुपारचं जेवण मध्यम एनर्जी देणारं असावं तर, रात्रीचं जेवण अतिशय हलकं घ्यावं असं सांगितलं जातं. त्यामुळेच रात्री सातनंतर कोणत्याही प्रकारचा आहार घेऊ नये. रात्री हलका आहार रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असणारे पदार्थ टाळा. हे पदार्थ पचण्यास अतिशय जड असतात. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो भाज्या आणि फळांचा वापर करा. (तुम्ही मासे खात नाहीत? मग ही बातमी वाचाच, अन्यथा...) रात्री नको चहा-कॉफी संध्याकाळी सातनंतर जेवण झाल्यावर चहा-कॉफी मुळीच घेऊ नका. चहा किंवा कॉफीमध्ये कॅफेन असतं. यामुळे आपली झोप कमी होते. याशिवाय मेटाबॉलिजम कमी होत जातो. म्हणूनच रात्री झोपण्याआधी चहा-कॉफी टाळावी. (डोळ्यात काजळ घालण्याने होतात वाईट परिणाम; बाळ कोमातही जाऊ शकतं) जेवणानंतर व्यायाम नको काही जणांना रात्री जेवल्यानंतर चालायची सवय असते मात्र, जेवल्यानंतर कमीत कमी फिजिकल एक्ससाईज कराव्यात. व्यायाम चुकूनही रात्रीच्या वेळी करू नये. यामुळे त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात. (आवडीने खाताय केक? माहिती आहे ना अंडं, साखर एकत्र घेतल्यास होतात Side Effect) अपुरी झोप वजन नियंत्रणात राहण्यासाठी पूर्ण झोप अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी 7 तास झोप घ्यायला हवी. वजन कमी राहावा असं वाटत असेल तर सात तास शांत झोप घ्यावीच. शिवाय योग्य वेळी झोपावं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Weight gain, Weight loss tips

    पुढील बातम्या