Home /News /lifestyle /

नियंत्रणात ठेवायचा आहे मधुमेह आणि वाढतं वजन? बदला तुमची खाण्याची पद्धत, वाचा सविस्तर

नियंत्रणात ठेवायचा आहे मधुमेह आणि वाढतं वजन? बदला तुमची खाण्याची पद्धत, वाचा सविस्तर

हल्लीची ‘फास्ट’ जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक जण आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देतात. यातही दोन समस्या अशा आहेत ज्या जगभरात दिसून येतात. त्यातली पहिली म्हणजे वजनवाढीची समस्या (Obesity) आणि दुसरी म्हणजे मधुमेह (Diabetes).

पुढे वाचा ...
मुंबई, 22 जानेवारी: हल्लीची ‘फास्ट’ जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक जण आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देतात. यातही दोन समस्या अशा आहेत ज्या जगभरात दिसून येतात. त्यातली पहिली म्हणजे वजनवाढीची समस्या (Obesity) आणि दुसरी म्हणजे मधुमेह (Diabetes). आजकाल तर शाळेत जाणाऱ्या मुलांनादेखील या दोन्ही समस्या असण्याचं प्रमाण वाढलं आहे. या समस्या अशा आहेत, ज्या पूर्णपणे बऱ्या तर होऊ नाहीत; पण वजन आणि आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण यावर नियंत्रण मात्र ठेवता येऊ शकतं (How to control diabetes). यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करणं आवश्यक आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही छोटे छोटे बदल केल्यास या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवता येऊ शकतील. मधुमेह हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे. त्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. जगभरात कोट्यवधी नागरिक याने ग्रस्त आहेत. मधुमेह असेल, तर तो नियंत्रित राहावा यासाठी नियमित व्यायाम (Exercise) आणि योग्य आहार (Diet Plan) घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही मधुमेह आणि वजनवाढीची समस्या असेल, तर खालील टिप्स वापरून त्यावर नियंत्रण ठेवू शकता. हे वाचा-दररोज 3 ते 4 कप कॉफी घेता?, मग ही बातमी खास तुमच्यासाठी योग्य आहार घेत असूनही अनेकदा हवे तसे बदल दिसून येत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेवणाचा क्रम. तुम्ही कुठला पदार्थ आधी खाता आणि कुठला नंतर खाता याचा आरोग्यावर बराच परिणाम होताना आढळून येतो. न्यू यॉर्क सिटी, वेइल कॉर्नेल मेडिकल कॉलेज इथल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमचं रोजचं जेवणही तुमच्या रक्तातलं इन्सुलिनचं प्रमाण वाढवू शकतं. बऱ्याचदा असं होतं, की आपण सॅलड, आणि प्रथिनयुक्त पदार्थ जेवणासोबतच खातो. या सवयीमुळे शरीरातलं हॉर्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. त्याचबरोबर कर्बोदकं (Carbohydrates) आणि प्रथिनं (Proteins) यांच्या एकत्रित सेवनाने वजनसुद्धा वाढू शकते. कार्बोहायड्रेट्स खाण्यापूर्वी प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले, तर तुमच्या रक्तातलं इन्सुलिन आणि ग्लुकोज वाढण्याचं प्रमाण 30-40% नी कमी होतं. म्हणूनच तज्ज्ञ असं सांगतात, की जेवणाची सुरुवात भाज्यांपासून करून नंतर सॅलडसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ आणि सगळ्यात शेवटी कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावं. हे वाचा-अंड्यासह खाताय हे पदार्थ? विविध आजारांना द्याल निमंत्रण, वेळीच घ्या काळजी कार्बोहायड्रेट्सच्या आधी प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने हॉर्मोन्सचं प्रमाण संतुलित राहतंच; पण त्याशिवायही अनेक फायदे होतात. अशा प्रकारे आहार घेतल्याने प्रजननक्षमताही चांगली राहते. याशिवाय त्वचादेखील तजेलदार राहते. आहाराचा हा क्रम वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या