मुंबई, 29 जानेवारी : वयानुसार शरीरात आणि आरोग्यात अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत उत्तम आरोग्यासाठी आपण काही शारीरिक चाचण्या करत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. याशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी सुधारणे आणि जीवनशैली अधिकाधिक निरोगी करणेदेखील महत्त्वाचे आहे. WebMD.com च्या बातमीनुसार, महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
विशेषत: वाढत्या वयात, जर त्या 40-50 वयोगटात प्रवेश करत असतील. तर त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या वयातील महिलांनी त्यांच्या आरोग्याशी निगडीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आम्ही तुम्हाला सांगतो.
कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी
40 ते 50 वयोगटातील महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यावी
बर्थ कंट्रोलच्या पद्धतीत बदल
अशा अनेक गर्भनिरोधक पद्धती आहेत, ज्या या वयात शरीराला हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या असू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि वय आणि गरजेनुसार गर्भनिरोधक तंत्रांची माहिती घेणे महत्वाचे आहे.
रजोनिवृत्तीबद्दल जाणून घ्या
हे असे वय असते जेव्हा स्त्रिया रजोनिवृत्तीतून जातात. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करणे चांगले होईल.
हाडांची काळजी घ्या
जर तुम्ही तुमच्या हाडांसाठी अजून काही खास करत नसाल तर आतापासून या गोष्टीकडे लक्ष दिलेले बरे. ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही रजोनिवृत्तीच्या समस्येतून जात असता ज्यामुळे तुमच्या हाडांना खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे अधिकाधिक सेवन करा.
स्क्रीनिंग चाचणी आवश्यक
तुम्ही तुमची स्क्रीनिंग चाचणी नियमितपणे करा. या वयात महिलांनी मॅमोग्राम तपासणी करून घेतली पाहिजे, जेणेकरून स्तनाच्या कर्करोगाची शक्यता योग्य वेळी ओळखता येईल. याशिवाय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, थायरॉईड, मधुमेह, कोलेस्टेरॉल इत्यादी तपासण्या करा.
प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी
प्रौढ लस
आपण दरवर्षी फ्लूची लस घेतल्यास चांगले होईल. याशिवाय त्यांनी कोणत्या प्रकारची लस घ्यावी याची माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. असे केल्याने तुम्ही मोठ्या आजारांचा धोका टाळू शकता.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Women