मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

टुथब्रश किती दिवसांनी बदलावा? अनेकजण फक्त घासत राहतात-घासत राहतात

टुथब्रश किती दिवसांनी बदलावा? अनेकजण फक्त घासत राहतात-घासत राहतात

टुथब्रश किती दिवसांनी बदलावा

टुथब्रश किती दिवसांनी बदलावा

अनेकदा आपण टूथब्रश पूर्ण घासून जाईपर्यंत वापरतो. अशावेळी हे माहीत असलं पाहिजे, की टूथब्रशची एक्स्पायरी डेट काय आहे. विकत घेताना कदाचित तुम्ही त्यावर लक्ष दिलं नसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 02 डिसेंबर : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे आपला दात घासण्याचा ब्रश, अर्थात टूथब्रश. दातांच्या स्वच्छतेसाठी टूथब्रश अपरिहार्य असल्याने तो निवडताना घेण्याची काळजी आणि टिप्स नक्की लक्षात ठेवा.

अनेकदा आपण टूथब्रश पूर्ण घासून जाईपर्यंत वापरतो. अशावेळी हे माहीत असलं पाहिजे, की टूथब्रशची एक्स्पायरी डेट काय आहे. विकत घेताना कदाचित तुम्ही त्यावर लक्ष दिलं नसेल. तुम्ही या खालील गोष्टी नक्की पहिल्या पाहिजेत. चुकीचा ब्रश निवडणे हे अनेकदा बऱ्याच रोगांना आमंत्रण ठरू शकतं.

तीन ते चार महिन्यांनी बदला टूथब्रश

'बडीडेंटल'च्या एका रिपोर्टनुसार, टूथब्रश तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. मात्र त्याची योग्य निवडही अतिशय गरजेची आहे. तुम्ही प्रत्येक तीन ते चार महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे. सोबतच टूथब्रश खरेदी करताना त्याचा योग्य ब्रँड निवडला पाहिजे. योग्य टूथब्रश निवडल्यानं तुमची मौखिक स्वच्छता अतिशय चांगली होऊ शकते. त्यामुळं असाच टूथब्रश निवडा जो हे निकष पूर्ण करत असेल. (how to choose toothbrush)

मऊ असावेत ब्रिसल्स

याशिवाय मऊ ब्रिसल्सचा पर्याय निवडा. तो आपल्या दातांच्या कडांवर चांगला वापरता येईल. खूप कठोर टूथब्रश दात साफ करण्यास मदतशील नसतो. दातांमध्ये घाण तशीच राहील. सोबतच ब्रिसल्स कडक असल्यास हिरड्यांना नुकसान पोचेल. त्यामुळे गरजेचं आहे, की असा ब्रश निवाडा जो हिरड्यांसाठीही चांगला असेल. (tips for ideal toothbrush)

अशी घ्या ब्रशची काळजी

टूथब्रश वापरल्यावर त्याला असंच इकडं-तिकडं नका ठेऊ. या गोष्टीवर लक्ष ठेवा, की टूथब्रश सुकल्यावरच त्याला बाजूला ठेवा. तुमच्या ब्रशमध्ये विविध किटाणू आणि बुरशी जन्मू नये, यासाठी त्याला काहीवेळ उभं करून ठेवा. त्यातलं पाणी निघून जाईल आणि तो सुकेल.

लांब दांड्याचा टूथब्रश निवडा

कॅप असलेला ब्रश निवडा. ब्रश सुकल्यावर त्याला कॅप लावून ठेवा. यातून तो धुळीपासून वाचेल. असाच ब्रश घ्या ज्याच्या हँडलची लांबी कमी नसेल. तेव्हाच तुम्ही तो सहजपणे वापरू शकाल.

हे वाचा - रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा

लहान ब्रश निवडा

टूथब्रश खरेदी करताना लहान आणि गोल डोक्याचा निवाडा. असे ब्रश सहजपणे तोंडाच्या विविध कोपऱ्यात पोचतात. दातांची सफाई चांगली होते. मात्र तुम्ही मोठा ब्रश निवडल्यास तो हे करू शकणार नाही आणि दात व हिरड्यांमध्ये घाण तशीच राहील.

First published:

Tags: Health, Health Tips