मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पुरुषांच्या नपुंसकतेची ही आहे कारणं? नका बाळगू भीती; वेळीच करा उपचार

पुरुषांच्या नपुंसकतेची ही आहे कारणं? नका बाळगू भीती; वेळीच करा उपचार

यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.

यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.

उत्तजना कायम ठेवण्यात असमर्थता निर्माण होण्याच्या समस्येला Erectile Dysfunction म्हणतात. काही जण याला नपुंसकता ( (Impotency) संबोधतात. पण यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. का होतं असं? जाणून घ्या

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 20 मे :  आपल्या जोडीदाराशी संबंध करताना पुरुषांच्या प्रायवेट पार्टमध्ये (Men's Private Parts) उत्तेजना नसणं किंवा उत्तजना कायम ठेवण्यात असमर्थता निर्माण होण्याच्या समस्येला इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणतात. काही जण याला नपुंसकता ( (Impotency) संबोधतात. काही काळानंतर ही समस्या हळूहळू मनात न्यूनगंड निर्माण करते. नपुंसकतेची अनेक कारणं असू शकतात. औषधं, मद्यपान किंवा धूम्रपान, शारीरिक अशक्तपणा, मधुमेह यासारख्या आजारामुळे पुरुषांमध्ये नपुंसकता येऊ शकते.  मात्र, समाजाच्या भीतीने याबाबतीत चर्चा केली जात नाही.

( फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing आधी वाचा ICMR ची Advisory)

हेल्थ वेबसाइट हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, नपुंसकतेची कारणं जाणून घेऊ यात. ऍडोक्राइन संबंधित आजार: शरीराची एंडोक्राइन सिस्टम (Endocrine System), म्हणजेच अंतःस्रावी प्रणाली, हार्मोन्स (Hormones) तयार करतात. जे मेटाबॉलिज्म (Metabolism),लैंगिक कार्य,पुनरुत्पादन, मूड आणि बऱ्याच गोष्टी नियंत्रित करतात. मधुमेह हा एंडोक्राइन(Endocrine)आजार आहे. या आजारा वापरले जाणारे हार्मोन इंसुलिन (Hormone Insulin) शरीरात नपुंसकत्व निर्माण करू शकतात. यामुळे मज्जातंतूचंही नुकसान होऊ शकतं,ज्यामुळे प्रायवेट पार्टमध्ये संवेदना कमी होतात.

(झोप येत नसेल तर खा हे खास चॉकलेट, प्रतिकारशक्तीही वाढेल आणि एनर्जी देखील!)

न्यूरोलॉजिकल आणि नर्व संबंधी विकार

बर्‍याचदा न्यूरोलॉजिकल परिस्थितीमुळे नपुंसकत्व येण्याचा धोका वाढतो. नर्व सिस्टम आणि मेंदूची रिप्रोडक्शन सिस्टम यांच्या समतोलाला नुकसान होतं. त्यामुळे इरेक्शन होण्यात अडचणी येतात.

औषधांचा प्रभाव

काही औषधं घेतल्यामुळे रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शन होऊ शकतं, म्हणजेच पुरुषांमध्ये जननेंद्रिय वक्रता येते. एखाद्या आजारासठी औषधं घेत असताना त्यामुळे नपुंसकत्व येत असलं तरी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार थांबवू नयेत.

 1 नपुंसकतेला कारणीभूत ठरणारी औषधं

2 तमसुलोसिन (फ्लोमॅक्स) बरोबर अल्फा-एड्रीनर्जिक ब्लॉकर्स

3 बीटा-ब्लॉकर्स म्हणजे कार्वेडिलोल (कोरग) आणि मेटोपोलोल (लोप्रेसर)

4 सिमेटिडाइन (टैगामेट) सारखी कॅन्सर केमोथेरेपीची औषधं

5 अल्प्राजोलम (ज़ानाक्स), डायजेपाम (वैलियम) आणि कोडीन सारखी सेंट्रल नर्वस सिस्टम (सीएनएस)ची औषधं

6 कोकेन आणि एम्फ़ॅटेमिन सारखी सीएनएस उत्तेजकं.

(तुम्ही योग्य वेळेला अंघोळ करताय ना? उठल्या उठल्या शॉवर घेणंही ठरू शकतं धोकादायक)

हृदय विकार

हृदय विकार आणि ब्लड पंप करण्याची क्षमता कमी करणारे आजार नपुंसकतेला कारणीभूत होऊ शकतात. जर, पुरुषांच्या प्रायवेट पार्टमध्ये पुरेसं रक्त पोहचत नसेल तर, इरेक्शन होत नाही. एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) मध्ये रक्तवाहिन्या बंद होतात आणि नपुंसकत्व येऊ शकतं. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लडप्रेशर मध्ये देखील नपुंसकत्व येण्याचा धोका निर्माण होतो.

(शारीरिक संबंधांसाठी BFसमोर ठेवलेली अट महागात; तीनदा गाठलं हॉस्पिटल, अखेर ब्रेकअप)

लाइफस्टाइल आणि मानसिक समस्या

इरेक्शन होण्यासाठी उत्तेजित होणं खूप महत्त्वाचं आहे. पण,जर तुम्ही मानसिक समस्येने ग्रासलेले असाल तर, याचा लैंगिक उत्तेजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. उदासिनता,कोणत्याही प्रकारच्या चिंता किंवा परफॉर्मन्स प्रेशरही या समस्येस बर्‍याचदा कारणीभूत ठरू शकतं. याआधी काधी इरेक्शन होऊ न शकल्याने तिचं भिती मनात राहिली असेल. तरही नपुंसकता येऊ शकते. कोकेन सारख्या ड्रगचे सेवनही एक कारण असू शकतं.

First published:

Tags: Health, Sexual health, Sexual wellness