Home /News /lifestyle /

हेल्दी राहण्यासाठी रोज खा मनुका; दात,त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक

हेल्दी राहण्यासाठी रोज खा मनुका; दात,त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक

मनुकांमुळे फ्रि रॅडिकल्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो

मनुकांमुळे फ्रि रॅडिकल्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो

मनुकांचा आहारात समावेश करावा. प्रजनन क्षमता (Fertility) वाढवण्याकरता मनुका (Raisins) जास्त फायदेशीर आहेत.

    वी दिल्ली, 27 जुलै : वाळलेल्या द्राक्षांना मनुका (Raisins) म्हणतात. आयुर्वेदातही (According to Ayurveda) याचं खुप महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून उत्तम आरोग्यासाठी हे ड्रायफ्रुट (Dry Fruit for Health) वापरलं जातं. मनुका थंड आणि गोड (Cold & Sweet) असतात. याचे आरोग्यासाठी बरेच फायदे  (Health Benefits) आहेत. एवढंच नाही तर, हे महिलांसाठी तर, जास्त फायदेशीर आहे. यात कॅटेचिन नावाचा अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट आणि कॅम्फेरॉल नावाचा फ्लॅव्होनॉईड असतो. ज्यामुळे कोलन ट्यूमरची (Colon Tumors) वाढ कमी करण्यास खुप मदत होते. याव्यतिरिक्त, त्यात पॉलिफेनोलिक,फायटोन्यूट्रिएंट्स देखील आहेत. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. तर मग जाणून घेऊया मनुका खाण्याचे काय फायदे आहेत. स्ट्रेस कमी होतो मनुका खाल्ल्यास मनावरील तणावाची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते. स्ट्रेस जाणवत असेल तर, गोढ पदार्थ खाण्याऐवजी मनुका खाल्ल्यास आराम मिळतो. (लय भारी! फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार) वजन कमी करण्यासाठी आपण वजन कमी करायचं असेल तर, स्नॅक्स म्हणून मनुका वापरू शकता. यात नॅचरल ग्लुकोज असतं ज्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न करण्यास मदत होते. मनुका खाल्ल्यास गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. (मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी करा ‘ही’ योगमुद्रा; कोणत्याही वेळी करू शकता ध्यान) शरीर मजबूत होतं मनुकांमुळे फ्रि रॅडिकल्सचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचं आरोग्य मनुका चांगलं ठेवतात. आपण लॅक्टोज इंटोलरेंटने ग्रस्त असलेल्यांवी मनुका खाव्यात. यात भरपूर कॅल्शियम आहे. ज्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. त्वचा आणि केसांसाठी फायदेशी रमनुका खाल्ल्याने त्वचेची फ्लेक्सिविटी कायम राहते आणि ती लूज होत नाही. केसही निरोगी राहतात आणि गळत नाहीत. (तजेलदार त्वचेसाठी 5 हेल्दी ड्रिंक्स पिऊन बघा; Cosmetics वापरणंही बंद कराल) दातांसाठी उत्तम दात किडण्याचा त्रास असेल तर, आपल्या आहारात मनुका नक्की घ्यायला सुरूवात करा. यामुळे दात किटण्याचा त्रास कमी होतो.आणि हिरड्या मजबूत होतात. (फुग्यासारखा कसा फुगतो फुलका? तुमच्या मनातल्या प्रश्नाचं सोपं उत्तर) गर्भधारणेसाठी ज्या महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील त्यांना काळ्या मनुका वरदान ठरू  शकतात. कारण काळ्या मनुकांच्या पाण्यामध्ये सर्व हॉर्मोनल समस्या दूर करण्याची ताकद आहे. यातील सोडिअम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट,फायबर, प्रोटिन्स, व्हिटॅमिन ई, डी आणि सी, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, झिंक, हे पोषक घटक प्रजनन क्षमतेसाठी गरजेचे असतात. ज्यामुळे काळ्या मनुका खाण्यामुळे स्त्रीयांची प्रजनन क्षमता वाढते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Pregnancy

    पुढील बातम्या