मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अचानक भूक कमी झालीय? दुर्लक्ष करू नका, असू शकते या पोषक तत्वाची कमतरता

अचानक भूक कमी झालीय? दुर्लक्ष करू नका, असू शकते या पोषक तत्वाची कमतरता

शरीरात जखम झाली की ती जखम भरून काढण्यासाठी झिंक मदत करते. बाळाच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी गर्भधारणेदरम्यान झिंक खूप महत्वाचे आहे.

शरीरात जखम झाली की ती जखम भरून काढण्यासाठी झिंक मदत करते. बाळाच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी गर्भधारणेदरम्यान झिंक खूप महत्वाचे आहे.

शरीरात जखम झाली की ती जखम भरून काढण्यासाठी झिंक मदत करते. बाळाच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी गर्भधारणेदरम्यान झिंक खूप महत्वाचे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च : झिंक हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे. शरीरातील झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात जखम झाली की ती जखम भरून काढण्यासाठी झिंक मदत करते. बाळाच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी गर्भधारणेदरम्यान झिंक खूप महत्वाचे आहे. विकसनशील मुले आणि किशोरांना अधिक झिंक म्हणजेच जस्त आवश्यक आहे. आपल्या शरीरात अनेकदा झिंकची कमतरता होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात झिंकचा साठा नसणे. त्यामुळे अन्नातून झिंक शरीरात पोहोचत नाही, तेव्हा झिंकची कमतरता सुरू होते.

झिंकच्या कमतरतेची कारणं

हेल्थ डायरेक्ट वेबसाइटनुसार, शरीरात झिंक साठवले जात नसल्यामुळे जर एखाद्याच्या रोजच्या आहारात झिंक नसेल, तर त्यांना झिंकची कमतरता होते. प्रथिने काही काळ झिंक शोषून घेऊ शकतात, परंतु जर आहारातून झिंक पुरेशा प्रमाणात आले नाही तर त्याची कमतरता होते. याशिवाय पोटाचे आजार आणि काही औषधांमुळेही झिंकची कमतरता होऊ शकते. शाकाहारी, वृद्ध आणि लहान मुलांना झिंकच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.

'या' ठिकाणी महिला, आई होणं तर सोडाच लग्नालाही देत आहेत नकार! हे आहे कारण

झिंकच्या कमतरतेची लक्षणे

शरीरात झिंकची कमतरता झाल्यानंतर एकाच वेळी अनेक लक्षणे दिसतात. सगळ्यात आधी भूक मरू लागते. अन्नाची चव आणि वासही जाणवत नाही. वजन कमी होऊ लागते. एखादी जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही. संसर्ग लवकरच सुरू होतो. अतिसार देखील होऊ शकतो. झिंकच्या कमतरतेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला चिडचिड होऊ लागते.

याशिवाय नखांचा रंग बदलू लागतो आणि झिंकच्या कमतरतेमुळेही केस गळायला लागतात. त्वचेवर जागोजागी पुरळ येतात. झिंकच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या समस्याही निर्माण होतात. शरीरात जास्त काळ झिंकचा पुरवठा होत नसेल तर पुरुषांमध्ये नपुंसकत्व येऊ शकते. यामुळे शुक्राणूंच्या संख्येत मोठी घट होते.

जर तुम्हालाही वर नमूद केलेल्ली लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरकडे जा. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना झिंकची कमतरता आहे की नाही हे कळते. जर झिंकची कमतरता असेल तर ती झिंक सप्लिमेंटने भरून काढता येते. मल्टीविटामिन टॅब्लेटमध्ये झिंक देखील असते. त्यामुळे त्याचे सेवन देखील फायदेशीर आहे.

पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर

झिंक समृध्द अन्न

असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये झिंक असते. जवळपास सर्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये झिंक असते. याशिवाय मासे, मटण, सीफूड इत्यादींमध्ये झिंक असते. शिया सीड्स, मोहरी, जवस, सूर्यफुलाच्या बिया, नाचणी इत्यादी बिया असलेल्या पदार्थांमध्ये झिंक पुरेशा प्रमाणात असते. शरीर स्वतः जस्त शोषत नसल्यामुळे, प्रथिने ते शोषून घेतात. त्यामुळे प्रथिनेयुक्त अन्नाचे अतिसेवन केल्यानेही झिंक वाढू शकते. चीज, चिकन ब्रेस्ट, कॉर्न फ्लेक्स, ताक, बीन्स, काजू, दूध, भोपळ्याच्या बिया इत्यादींमध्ये झिंक आढळते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle