मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Spinach Benefits : पालक खाण्याची फक्त पद्धत बदला, आरोग्याला होतील दुप्पट फायदे!

Spinach Benefits : पालक खाण्याची फक्त पद्धत बदला, आरोग्याला होतील दुप्पट फायदे!

हिरव्या पालेभाज्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्यासोबतच तुम्ही त्यांचा ज्यूसही करून पिऊ शकता.

हिरव्या पालेभाज्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्यासोबतच तुम्ही त्यांचा ज्यूसही करून पिऊ शकता.

हिरव्या पालेभाज्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्यासोबतच तुम्ही त्यांचा ज्यूसही करून पिऊ शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : पोषक तत्वांनी समृद्ध हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्यासोबतच तुम्ही त्यांचा ज्यूसही करून पिऊ शकता. पोषक तत्वांनी युक्त आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालकाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

तुम्ही ताजे पालक मिक्सरमध्ये पाण्यासोबत बारीक करून सेवन करू शकता. बहुतेक लोक ते शिजवल्यानंतर खाण्याचा सल्ला देतात. परंतु तुम्ही त्याचा ज्यूस करून प्यायलात तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. काही जण पालकाची पानं उकळून पालक पनीर, पराठा किंवा भाजी बनवतात आणि त्याचे पाणी फेकून देतात. परंतु या पाण्यात जास्तीत जास्त सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. हे पाणी प्यायल्याने अनेक शारीरिक आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. जाणून घेऊया पालकाचा ज्यूस पिण्याचे फायदे...

पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर

रोगप्रतिकारशक्ती वाढते

पालकामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पालकाचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात प्रोटिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक सूक्ष्म पोषक घटकांमुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जुनाट आजार दूर होतात.

रक्तदाब नियंत्रित राहतो

पालकाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

कर्करोगापासून बचाव होतो

पालक हृदयाशी निगडित आजारांपासून बचाव करण्यास आणि कर्करोग नष्ट करण्यास देखील मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने वजन कमी होते. तसेच फुफ्फुस, प्रोस्टेट आणि कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता नाहीशी होते.

पालकाचे पाणी पोटासाठी फायदेशीर

पालकाचे पाणी पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पालकाच्या पोषकतत्त्वांमध्ये आहारातील फायबरचाही समावेश असतो. हे तुमचे चयापचय वाढवते आणि पोटाचे कार्य गतिमान करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही.

पालकाच्या पाण्याने दृष्टी सुधारते

पालक पाण्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट असतात. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए आढळून येते जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यास डोळे कोरडे होणे आणि रातांधळेपणा होऊ शकतो.

पालकाचे पाणी केसांसाठी फायदेशीर

पालकाच्या पाण्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कारण यामध्ये आयर्न आणि प्रोटीनसारखे अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे केसांना आतून मजबूत आणि सुंदर बनवण्यास मदत करतात.

तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक

पालकाच्या पाण्यामुळे त्वचा निरोगी राहते

पालकाचे पाणी प्यायल्याने डोळे, केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. पालकाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बरोबर राहून त्वचा आतून ग्लो करते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle