मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /चुकूनही खाऊ नका असा तांदूळ; होईल Food Poisoning

चुकूनही खाऊ नका असा तांदूळ; होईल Food Poisoning

व्यवस्थित न शिजलेला भात खायची (Eating Rice is healthy) सवय असेल तर लगेच सोडा. पोटाचे विकार (Stomach Disorders) वाढतील आणखीनही बरेच आजार होतील.

व्यवस्थित न शिजलेला भात खायची (Eating Rice is healthy) सवय असेल तर लगेच सोडा. पोटाचे विकार (Stomach Disorders) वाढतील आणखीनही बरेच आजार होतील.

व्यवस्थित न शिजलेला भात खायची (Eating Rice is healthy) सवय असेल तर लगेच सोडा. पोटाचे विकार (Stomach Disorders) वाढतील आणखीनही बरेच आजार होतील.

दिल्ली, 10 जून: चपाती किंवा पोळीऐवजी अनेक लोकांना भात (Rice) खायला जास्त आवडतो. किनारपट्टीच्या भागात राहणारे लोकांचं तर भात प्रमुख अन्न आहे. या डाळ-भात, खिचडी, पुलाव असे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. काही लोक नेहमीच्या पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस (Brown Rice) खातात. ब्राऊन राईस खाण्याचेही जास्त फायदा आहेत. तांदळामध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमीन आणि मिनरल्स (Vitamin & Mineral) असतात. यात व्हिटॅमीन डी, कॅल्शियम, फायबर, आयर्न, थायमिन आणि रायबोफ्लोविन मोठ्या प्रमाणात असतं. तर, ब्राउन राईसमध्ये भरपूर मात्रेत प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव (Prevention From many Diseases) होतो. पण, काही लोकांना न शिजलेला तांदूळ खायची आवड असते.

कच्चा तांदूळ खाणं आरोग्यासाठी हानिकारक(Harmful to Health) असतं. यामुळे शरीराला गंभीर त्रास होऊ शकतो.  याबद्दल माहिती जाणून घ्या.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल  आणि पचना संबंधीची त्रास

कच्च्या तांदळात काही असे घटक असतात ज्यामुळे पचनासंबंधी समस्या (Digestive Problems)निर्माण होतात. यामध्ये लेक्टीन नावाचं प्रोटीन असतं. हे प्रोटीन नैसर्गिक कीटकनाशक आणि ऍन्टीन्यूट्रिअयन्ट म्हणून काम करतं. त्यामुळे कच्चे तांदूळ खाल्याने पचनासंबंधीच्या अडचणी निर्माण होतात.

(अल्झायमरच्या रुग्णांना दिलासा;पहिल्यांदाच मिळालं औषध; Aduhelm ला एफडीएची मंजूरी)

किडनी स्टोन

किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांसाठी कच्चे तांदूळ खाणं नुकसानदायक असतं. अशा प्रकारचे तांदूळ जास्त प्रमाणात खाण्यामुळे स्टोन वाढण्याची शक्यता असते.

(3 कोटींचं घर तरी, रस्त्यावर विकते जेवण; का घेतला उर्वशीने हा निर्णय?)

फूड पॉयझनिंगची शक्यता

कच्चे तांदूळ खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंगचा त्रास व्हायला लागतो. तांदळामध्ये बेसिलस सिरस नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे शरीराला फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कच्चे तांदूळ खाऊ नका.

ऊर्जा कमी होते

कच्चे तांदूळ खाल्यामुळे शरीरात आळस वाढायला सुरुवात होते. कच्चे तांदूळ खात असाल तर, दिवसभर थकवा जाणवतो. कोणतंही काम करताना उत्साह वाटत नाही. त्यामुळे असे तांदूळ खायची सवय असेल तर लगेच बंद करा.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips