Home /News /lifestyle /

Health Tips : पनीर आणि अंडी एकत्र खावे का? वजन कमी करणाऱ्यांना हे माहित असावंच

Health Tips : पनीर आणि अंडी एकत्र खावे का? वजन कमी करणाऱ्यांना हे माहित असावंच

काही लोक वजन नियंत्रित करण्यासाठी अंडी आणि पनीर खातात. कारण यात कॅलरीज कमी आणि प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी भूक कमी करणारे हार्मोन्स वाढवतात.

  मुंबई, 06 ऑगस्ट : सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक जणांना आपल्या आहाराकडे लक्ष देण्यास आणि व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही जण वजन कमी करण्यासाठी हार्ड वर्कआऊटसह वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. परंतु खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. काही लोक वजन नियंत्रित करण्यासाठी अंडी आणि पनीर खातात. कारण यात कॅलरीज कमी आणि प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी भूक कमी करणारे हार्मोन्स वाढवतात. पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीराला काही फायदा होतो का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पनीर आणि अंडी कसे फायदेशीर ठरतात? पनीर आणि अंडी वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. पनीर हा झटपट ऊर्जेचा स्रोत आहे तर अंड्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायेशीर घटक मिळतात. परंतु पनीरच्या अनेक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल आणि मसाले वापरले जातात आणि ते वजन वाढवण्यासाठी करणीभूत ठरतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांनी पनीर टिक्कासारखे आरोग्यदायी पदार्थ खावेत.

  औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आलं; सर्दी-खोकलाच नाही तर या आजारांवरही अतिशय फायदेशीर

  पनीर प्रमाणात खाल्ल्यास ते शरीरासाठी फायदेशीर असते.अंड्यांचा विचार केला तर ते आपल्या शरीरातील आवश्यक अमीनो ऍसिडचे संतुलन राखले जाते. तसेच अंडी पचनशक्ती वाढवते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. अडी खाल्ल्याने कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. Food For Memory : स्मरणशक्ती वाढवतील हे पदार्थ, माईंड सुपरफास्ट होण्यासाठी असा असावा आहार पनीर आणि अंडी एकाच वेळी खावे का? अंडी आणि पनीर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. झी न्यूजच्या वृत्तानुासर GIMS हॉस्पिटल ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी वजन कमी करण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्य पर्याय आहेत असल्याचे सांगितले आहे. प्रोटीन्स हळूहळू पचतात, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. तसेच तुम्ही अंडी आणि पनीर एकाच वेळी खाऊ शकता. परंतु त्यांचा जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Food, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या